प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाने केलेली प्रगती थक्क करणारी -माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर
तुळजापूर दि 7 डॉ . सतीश महामुनी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशामध्ये जो विकास झालेला आहे, त्याच्यामुळे सामान्य माणसाचे जीवन उंचावले आहे, सर्वच क्षेत्रात केलेली प्रगती थक्क करणारी आहे असे उद्गार माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काढले.
तुळजापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या तालुका कार्यालयात माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. स्थापना दिनाच्या निमित्ताने प्रतिमा पूजन केले आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. पंचायत समितीचे माजी सभापती संतोष बोबडे, ग्रामीण तालुकाध्यक्ष महादेव जाधव व तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती विक्रम देशमुख, प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, ओबीसी जिल्हा आघाडी अध्यक्ष विजय शिंगाडे, माजी शहराध्यक्ष शांताराम पेंदे, माजी शहर सरचिटणीस उमेश गवते, शिवाजी डावखरे, रत्नदीप भोसले, गिरीश देवलालकर यांची उपस्थिती होती.
यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी भारतीय जनता पार्टीचा जनसंघापासून चा इतिहास उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितला. जनतेची सेवा करून पक्षाने जनाधार प्राप्त केला, काँग्रेस शासन काळात विरोधी पक्ष म्हणून भाजप आणि खंबीर आणि प्रभावी भूमिका मांडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिष्मा देशाच्या सर्व भागात चालतो आहे विकासाचा नवा आयाम नरेंद्र मोदी यांनी प्रस्थापित केला जो त्यांनी गुजरात पासून सुरू केला होता त्याला सबंध देशभर प्रस्थापित केले. हा त्यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास आज जगातील सर्वात मोठी पार्टी म्हणून भाजपने मिळविला आहे त्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्याची आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण केंद्र शासन आणि राज्य शासन ज्या विकासात्मक योजना राबवत आहे त्याला योग्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम आपणास करावयाचे आहे असे त्यांनी सांगितले. या निमित्ताने सभापती विक्रम देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मराठवाड्याच्या रोजगार मेळावा समन्वयकपदी तुळजापूर येथील गणेश चादरे यांची निवड
6 days ago
धाराशिव जिल्ह्यातील युवा पत्रकार अनिल आगलावे यांना राज्यस्तरीय डॉ. पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
1 week ago
विकसित भारतासाठी प्रत्येकाचे – योगदान महत्त्वाचे अविनाश धर्माधिकारी
1 week ago
हिंदू संस्कृतीवर आघात करणाऱ्या घटकांना वैचारिक विरोध करण्याची क्षमता संस्कार भारतीच्या कार्यकर्त्याची झाली पाहिजे – अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांचे प्रतिपादन
2 weeks ago
भारतीय जनता पार्टी कडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सुनील मधुकरराव चव्हाण इच्छुक…
2 weeks ago
तुळजापूर भारतीय जनता पार्टीचा चेहरा गुलचंद भाऊ व्यवहारे, तुळजापूर वैराग आणि परंडा येथे सत्कार
3 weeks ago
तुळजापूर येथील स्वराज जळके याचे दहावी मध्ये यश
4 weeks ago
कनिष्ठ महाविद्यालयीन प्रश्नासाठी शिक्षक होण्याच्या रस्त्यावर, राज्यातील शिक्षकांचा विराट मोर्चा