महाराष्ट्रसंपादकीय
बीदरचे देवी भक्त मल्लिकार्जुन कलगी यांच्या कडून तुळजाभवानीला ३ लाखांची देणगी
तुळजाभवानी देवीच्या देणग्यांचा ओघ वाढला

0
0
3
8
6
1
बीदरचे देवी भक्त मल्लिकार्जुन कलगी यांच्या कडून तुळजाभवानीला ३ लाखांची देणगी
तुळजापूर दि १९ डॉ. सतीश महामुनी
कर्नाटक राज्यातील नांदगाव, तालुका हुमनाबाद, जिल्हा बीदर येथील श्री तुळजाभवानी देवींचे भक्त मल्लिकार्जुन कलगी यांनी आज श्री तुळजाभवानी देवींना ३ लाख रुपयांची देणगी अर्पण केली.
मल्लिकार्जुन कलगी हे आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आले होते. देवींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर संस्थानकडे ही देणगी अर्पण केली.
यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा देवीची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
0
0
3
8
6
1



