आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

0 0 3 8 8 2

डॉ. न. म. जोशी यांचा साहित्यदीप जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

पुणे : डॉ. न. म. जोशी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. राज्य शासनातर्फे कवीवर्य विंदा करंदीकर यांच्या नावे दिला जाणरा जीवनगौरव पुरस्कार डॉ. जोशी यांना दिला जावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे, अशा भावना नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या.

साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे साहित्यदीप जीवन गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांना आज (दि. ६) सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे वितरण माधुरी मिसाळ यांच्या झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, सल्लागार वि. सु. चव्हाण मंचावर होते. कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

माधुरी मिसाळ पुढे म्हणाल्या, युवा पिढी आज साहित्य, संस्कृती, इतिहासापासून दूर गेली आहे त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. युवा पिढीमध्ये साहित्यविषयक संस्कार प्रयत्नपूर्वक रूजविणे आवश्यक आहे.

पुरस्काराला उत्तर देताना डॉ. न. म. जोशी म्हणाले, आजचा काळ बदलला आहे. या काळात चांगल्या माणसांची आठवण चांगल्या माणसांनी ठेवणे अवघड झाले आहे. सर्वत्र बाजारीकरण झालेले असताना संस्कृती, मूल्ये मागे पडत आहेत. अशा काळात काही प्रकाशाची बेटे संस्कृती टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातील साहित्यदीप प्रतिष्ठान हे एक बेट आहे. अशा संस्थेकडून मिळणारा जीवनगौरव पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे. माधुरी मिसाळ या स्त्री शक्तीची ताकद दाखवत अत्यंत खंबीरपणे लोकोपयोगी कार्य करत आहेत याचाही डॉ. जोशी यांनी गौरव केला.

सुरुवातीस ज्योत्स्ना चांदगुडे यांनी प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती विशद केली. सन्मानपत्राचे वाचन धनंजय तडवळकर यांनी तर कार्यक्रमाचे निवेदन चिन्मयी चिटणीस यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित काव्यमैफलीत वि. ग. सातपुते, विलास कुवळेकर, वि. सु. चव्हाण, शशिकांत तिरोडकर, मीना शिंदे, डॉ. तरुजा भोसले, रेखा येळंबकर, शंतनु कुलकर्णी, अश्विनी जगताप, उमा व्यास, यांचा सहभाग होता. काव्य मैफलीचे सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

फोटो : साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) वि. सु. चव्हाण, माधुरी मिसाळ, डॉ. न.म. जोशी, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर, चिन्मयी चिटणीस यांची याप्रसंगी उपस्थिती आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 8 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे