ई-पेपरदेश-विदेशमहाराष्ट्र

0 0 3 8 8 2

इनामी जमीन निर्मूलन प्रारूप कायमस्वरूपी रद्द करावे – तुळजापुरातील पुजारी मंडळाची मागणी

तुळजापूर दि ६  प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यामध्ये केवळ हिंदू देवस्थानाच्या जमिनीवर सरकारने सुरू केलेले प्रयत्न अत्यंत चुकीचे आहेत, देव देवतांच्या जमिनी व्यक्तिगत नावे करणे हिंदू धर्मावरील खूप मोठे संकट आहे असे धोरण तात्काळ रद्द करावे अशी मागणी तुळजापुरात महंत इच्छागिरी महाराज, महंत मावजीनाथ महाराज यांनी केली आहे.
तुळजाभवानी पुजारी मंडळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये महंत इच्छागिरी महाराज, महंत मावजीनाथ महाराज, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम, तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे, प्रा. धनंजय लोंढे, जनहित संघटनेचे अजय साळुंखे यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम प्रा. धनंजय लोंढे यांनी सरकारने नव्याने महाराष्ट्र राज्य इनामी जमीन निर्मूलन प्रारूप अधिनियम याच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती दिली आणि या विधेयकाला आपला विरोध केला. जनहित संघटनेचे अजय साळुंखे यांनी आपला विरोध नोंदवला.
या पत्रकार परिषदेमध्ये महंत इच्छागिरी महाराज यांनी सरकारने हे अत्यंत चुकीचे पाऊल टाकले आहे, देव देवतांच्या आणि देवस्थानाच्या जमिनी व्यक्तिगत नावावर करणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे धर्म आणि हिंदू देवस्थान अडचणीत येणार आहेत. या निर्णयाला आमचा विरोध आहे असे सांगितले. महंत मावशीनाथ महाराज यांनी या विधेयकाला आमचा विरोध असल्याचे सांगून मंदिराच्या सेवा आणि भाविकांच्या सेवा या जमिनीच्या उत्पन्नामधून होतात याची सरकारला माहिती आहे तरीही असा चुकीचा निर्णय समोर आणणे चुकीचे आहे. कायमस्वरूपी हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली. या निमित्ताने तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ अध्यक्ष अमरराजे कदम यांनी या संदर्भात आपण उच्च न्यायालयात आक्षेप नोंदवला असल्याचे सांगून हिंदू देवस्थानावर हे खूप मोठे संकट आहे. हिंदुत्ववादी असणारे सरकार विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून सदर कायदा कायमस्वरूपी रद्द करावा अशी मागणी केली. या भागात निजाम राजवट देखील अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकले नाही मग हे हिंदुत्ववादी सरकार कसे असा निर्णय करू शकते असा प्रति प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
चौकट
महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदू देवस्थानाबद्दल अशा प्रकारचा निर्णय घेणे हेच महाराष्ट्रासाठी चिंताजनक आणि खेदजनक आहे व

क्र  बोर्डाच्या जमीन संदर्भात असा निर्णय का होत नाही असे देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मान्यवरांनी आपले मत नोंदवले.

Error Icon

Address not found

Your message wasn’t delivered to solapurpudhari@gmail.com because the address couldn’t be found, or is unable to receive mail.
LEARN MORE
lllh
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 3 8 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे