ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे तुळजाभवानी दर्शन, दर्शनानंतर मंत्री महोदयांच्या शुभहस्ते साड्यांचे वितरण
भाजप प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे परिवाराच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना कवड्याची माळ आणि तुळजाभवानीची प्रतिमा देऊन मानाचा सत्कार

0
0
6
3
2
6
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे तुळजापुरात जोरदार स्वागत, तुळजाभवानी देवीचे दर्शन
तुळजापूर दि १९ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार आशीर्वादरूपी देणारी ही तुळजाभवानी आमची प्रेरणास्थान आहे देवीच्या दर्शनाने मिळणारी ऊर्जा निश्चितच गोरगरीब जनतेच्या कल्याणकारी कामकाजाला पाठबळ देणारी आहे, तुळजापूरकरांचे आजचे स्वागत मनस्वी आनंद देणारे आहे देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आहे अशा भावना केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी तुळजापुरात व्यक्त केले.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे तुळजापूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले, मंत्री महोदयांचे दुपारी तुळजाभवानी दर्शन संपन्न झाले. फटाक्यांच्या आतबाजीमध्ये त्यांचा सत्कार संपन्न झाला.
तुळजाभवानी मंदिरासमोर गरजू महिलांना मंत्रिमहोदयांच्या शुभ हस्ते प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांनी आयोजित केलेल्या साड्यांचे वितरण केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, अनिल काळे, शिवाजी बोधले, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब भोसले, इंद्रजीत साळुंके, सागर पारडे, विकास मलबा, उमेश गवते, साहेबराव घुगे, प्रा. संभाजी भोसले उपस्थित होते.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या तामलवाडी येथे प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांचे शुभहस्ते स्वागत करण्यात आले. देवीची पुजारी विकास मलबा यांनी विधिवत मंत्री नाईक यांची पूजा केली आणि त्यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे यांच्या धाराशिव रोड रस्त्यावरील निवासस्थानी भेट दिली आणि त्यांचा कौटुंबिक सत्कार स्वीकारला, तुळजाभवानीची प्रतिमा कवड्याची माळ देऊन त्यांचा व्यवहारे परिवाराच्या फुलचंद व्यवहारे व गुलचंद व्यवहारे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तुळजापूर येथील रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष बबन गावडे पत्रकार अंबादास पोफळे यांच्या शिष्टमंडळाने सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गासाठी सहकार्य केल्याबद्दल ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील विविध संघटना आणि भाजपचे पदाधिकारी यांनी यानिमित्ताने श्रीपाद नाईक यांचा सत्कार केला.
0
0
6
3
2
6


