आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्र
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी केंद्र सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा करू – केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे आश्वासन
तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर सत्काराला उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केल्या भावना

0
0
7
8
5
8
तुळजाभवानी देवीच्या विकास आराखडा राबविण्यासाठी केंद्र सरकारकडे योग्य पाठपुरावा करणार – केंद्रीय राज्यमंत्र्यांची ग्वाही
तुळजापूर दि 19 प्रतिनिधी डॉ.सतीश महामुनी
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याची केंद्र सरकारने दिलेली निधीची मंजुरी यामुळे देवीच्या भावी भक्तांची सुविधा होणार आहे या विकास आराखड्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे आवश्यकता पडल्यास आपण योग्य तो पाठपुरावा करू अशी ग्वाही केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी तुळजाभवानी मंदिरात झालेल्या सत्कार नंतर बोलताना दिली.
याप्रसंगी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपा प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी , माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे, साहेबराव घुगे, अनिल काळे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष उमेश गवते, संभाजी भोसले, विकास मलबा, मंदिर मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
तुळजाभवानीची दर्शन घेण्याची आमच्या परिवाराची जुनी परंपरा आह दरवर्षी देवीच्या दर्शनाने मिळणाऱ्या ऊर्जेमुळे राजकारणामध्ये चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे सांगून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो लाखो भाविकांच्या सुविधेसाठी शासन स्तरावर विकास आराखडा मंजूर झालेला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी, या विकासा राखण्याच्या अंमलबजावणीसाठी उचित सहकार्य करू असे आश्वासन यानिमित्ताने केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद माईक यांनी दिले.
0
0
7
8
5
8



