ई-पेपरराजकियसंपादकीय

राजकारणातील गौरवास्पद क्षण, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहारे राजकारणापलीकडचे जिव्हाळ्याचे नाते सांभाळणारी नेते आणि कार्यकर्ते

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य गुलचंद व्यवहारे यांची राजकारणातील ३० वर्षे

0 0 6 3 2 6

गुलचंद व्यवहारे यांची भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातील ३० वर्ष, पार्टी लाईनवर चालणारा कार्यकर्ता

तुळजापूर दि १९ डॉ. सतीश महामुनी

भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी या पार्टीमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून कशाची अपेक्षा न करता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आजही कार्यरत आहे, पक्षासाठी सतत काम करणे सदैव काम करणे, फारशी अपेक्षा न बाळगता काम करणे राष्ट्रीय विचार सोबत घेऊन काम करणे अशी भावना बाळगून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने हा पक्ष आजपर्यंत उभा राहिला अशाच परंपरेतील एक पाईक म्हणजे गुलचंद दगडोबा व्यवहारे, १८ जुलै रोजी तुळजापूर शहरांमध्ये केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचा दौरा तुळजाभवानी देवीचे दर्शनाच्या निमित्ताने झाला. या सर्व दौऱ्याच्या भोवती केंद्रबिंदू ठरले ते गुलचंद दगडोबा व्यवहारे.

केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मागील २५ वर्षापासून तुळजाभवानी देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने आल्यानंतर स्थानिक भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्याबरोबर आपले जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आहेत. संघ विचार आणि भाजपचा विचार बाळगून काम करणाऱ्या पिढी मधील केंद्रीय मंत्री म्हणून श्रीपाद नाईक यांचा लौकिक आहे. त्याच परंपरेमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये काही बोटावर मोजण्या एवढी नेते आज क्रियाशील आहेत यामध्ये सुजित सिंह ठाकुर आणि गुलचंद्र व्यवहारे हे दोन नावे या जिव्हाळ्याच्या नातेसंबंधाच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये आज सक्रिय असणारी नावे आहेत. याचा प्रत्यय आणि परिचय १८ तारखेच्या दौऱ्यामध्ये सर्वांनाच आला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी श्री व्यवहारे यांच्या हडको परिसरात असणाऱ्या निवासस्थानी भेट दिली तेथे व्यवहारे परिवाराच्या वतीने करण्यात आलेला कौटुंबिक स्वागत सत्कार समारंभ स्वीकारला.

उपस्थित सर्व स्थानिक विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा त्यांनी परिचय करून घेतला. अनेक विषयावर या ठिकाणी चर्चा झाली या चर्चेच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी संघटनात्मक कामाची ऊर्जाच दिली. राजकारणातील सुरू असणारे गुन्हेगारीकरण आणि बाजारीकरण त्याचबरोबर गुत्तेदारीकरण या सगळ्यांच्या पलीकडे भाजपा अंतर्गत असणारे हे पार्टी नात्याचे जिव्हाळीकरण सर्वांना अनुभवता आले. अशा प्रकारचा अनुभव क्वचितच राजकारणामध्ये मिळतो आणि जर कुणाला मिळाला तर तो सहसा सार्वजनिक केला जात नाही. याला देखील अपवाद म्हणून गुलचंद व्यवहारे यांनी सर्वांनाच आपल्या आनंदामध्ये सहभागी करून घेतले हे विशेष आहे.

तुळजाभवानीची तीर्थक्षेत्र असणाऱ्या या नगरीमध्ये सर्वच नेते मंडळी देवी समोर नतमस्तक होण्यासाठी येतात. त्या निमित्ताने स्थानिक पदाधिकाऱ्यांना या नेते आणि उच्चपदस्थ मंडळी सोबत वावरण्याची संधी उपलब्ध होते. याचाच प्रत्यय या निमित्ताने आलेला आहे.

भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी वर्षानुवर्ष काम केले. स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर आणि मुंबई मंत्रालय पातळीवर तसेच दिल्लीच्या मंत्रालय पातळीवर देखील ज्यांनी लहान-मोठी काम करत असताना या सर्व आपल्या जिव्हाळ्याच्या नातेसंबंधांचा उपयोग आपल्या मित्रपरिवार आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या कामासाठी केला असा सर्वांनाच आपला वेळ देऊन अडचणीच्या काळात मदत करणारा कार्यकर्ता म्हणून देखील गुलचंद व्यवहारे यांनी आपला लौकिक राजकारणामध्ये प्रस्थापित केला आहे. गुरुस्थानी असणारे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना देखील गुलचंद व्यवहारे यांनी राजकारणाच्या पलीकडे निर्माण केलेले नातेसंबंध आणि सर्व नेतेमंडळी यांच्या सोबत असलेला जिव्हाळा तेवढाच कौतुकाचा वाटला. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सहजपणे वावरताना दिसत होता.

राजकारणामध्ये पैसा कमावण्यापेक्षा माणसं कमावल्यानंतर जे मिळतं ते केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या सहज वावरण्यामध्ये सर्वांना दिसून आले अनेकांनी ते बोलून दाखवले. अनेकांनी व्यक्त केलेल्या भावना मी केवळ या ठिकाणी शब्दबद्ध करतो आहे.

अनेक क्षणांचा आणि अनेक वर्षांचा साक्षीदार असल्यामुळे हे लिहिण्याचे सुचले. या सगळ्यांच्या पाठीमागे तीस वर्षाची सामान्य कार्यकर्त्याची तपश्चर्य कष्ट त्याग आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. तीस वर्षाचे गुलचंद व्यवहारे यांनी राजकारणामध्ये पेरले आहे ते आता उगवू लागले आहे असेच म्हणावे लागेल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे