ई-पेपरमहाराष्ट्र

काँग्रेस नेते, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक, मंदिर प्रशासनाच्या वतीने सन्मान, काँग्रेस नगरसेवकांची उपस्थिती

तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने नाना पाटोळे यांचा कार्यालयात सत्कार

0 0 5 5 9 9

काँग्रेसचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन,

तुळजापूर दिनांक 19  डॉ. सतीश महामुनी

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सह कुटुंब परिवार घेतले, तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी यांनी तुळजाभवानी देवीची प्रतिमा देऊन माजी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार केला. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर प्रशासकीय कार्यालयामध्ये मंदिर संस्थांच्या वतीने तुळजाभवानीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी  शेतकरी राजा सुखी राहू दे …. बळी राजाचे राज्य येऊ दे…. असे साकडे य तुळजाभवानी देवीला  घातले. शेतकरी वर्गाच्या दृष्टीने सध्याचा काळ अत्यंत कसोटीचा झाला आहे सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला आज पावसाची मोठी गरज आहे.

पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्याच्या शेतामध्ये टिकणार नाही आणि होणारे नुकसान सहन करण्याची आता शेतकऱ्याची क्षमता राहिली नाही त्यामुळे हे भवानी माते महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना चांगला पाऊस दे आणि चांगलं पीक त्यांच्या शेतामध्ये येऊ दे अशा शब्दात काँग्रेसचे नेते नाना पटोले तुळजाभवानी देवीला विनवणी केली. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, तालुकाध्यक्ष अरविंद बेडगे, नगरपरिषदेच्या गटनेचे अमोल कुतवळ, नगरसेवक रणजीत इंगळे, नगरसेवक आनंद जगताप यांनी यावेळी स्थानिक विविध प्रश्नांवर नाना पटोळे यांच्याबरोबर चर्चा केली.

वेळी उपस्थित कॉंग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज  पाटील, नगर परिषद गटनेते अमोल कुतवळ,नगरसेवक रणजित इंगळे, आनंद जगताप, तालुकाध्यक्ष अरविंद बेडगे,हरीश चव्हान असंख्य कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सहकुटुंब सहपरिवार तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले आशीर्वाद घेतले. नाना पटोले  यांच्या या दौऱ्यामुळे तुळजापूर शहरातील काँग्रेस पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 5 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे