
0
0
6
3
2
6
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सहकुटुंब घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन
तुळजापूर :- महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे जाऊन कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीला सहकुटुंब भावपूर्ण वातावरणात अभिषेकपुजा हा कुलधर्म कुलाचार करून दर्शन घेतले. राज्याच्या समृद्धीसाठी, जनतेच्या आरोग्यासाठी आणि शांततेसाठी त्यांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात शिवसेनेच्यावतीने माजी आमदार ज्ञानराज चौगुले,माजी जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,माजी जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,यांनी स्वागत केले. मंदिर प्रशासनाकडून विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्याकडून देविची प्रतिमा व देविची साडी भेट देवून सत्कार करण्यात आला.

”महाराष्ट्रावर आणि तमाम जनतेवर आई तुळजाभवानीचा वरदहस्त कायम राहावा. राज्याची भरभराट व्हावी आणि सर्व नागरिकांना सुख, समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, हीच आईच्या चरणी प्रार्थना केली आहे.”
— योगेश कदम, गृहराज्यमंत्री
दर्शन सोहळ्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. याप्रसंगी शिवसेनेचे देवानंदभाऊ रोचकरी,बळीराम सुरवसे,
जगन्नाथ पाटील,अभिराम पाटिल,गणेश रोचकरी,
गणेश जगताप,विकास जाधव,महेश केदार,
अजित लाकाळ,अमोल जाधवसह पोलीस प्रशासन, मंदिर संस्थानाचे अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
6
3
2
6


