
0
0
6
3
2
6
रोटरी क्लब तुळजापूर मेंबरशिप डेव्हलपमेंट पुरस्काराने सन्मानित
तुळजापूर दि. १९ प्रतिनिधी
सोलापूर येथे पद्मावती कन्व्हेंशन हॉलमध्ये आयोजित रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये रोटरी क्लब तुळजापूरला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो .जयेश पटेल आणि डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो .नितीन कुदळे यांच्या हस्ते *’मेंबरशिप डेव्हलपमेंट पुरस्कार’* प्रदान करून गौरविण्यात आले.
रोटरी क्लब तुळजापूरने उल्लेखनीय सदस्यवाढ करत १३ नवीन सदस्यांची नोंद केल्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल तर्फे प्लॅटिनम हा प्रतिष्ठेचा पहिल्या नंबर चा पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब तुळजापूरचे अध्यक्ष रो. अमर हंगरगेकर, सचिव रो. संजय मैंदर्गी, रो. संतोष लोखंडे, पी डी जी रो. विष्णू मोंढे,रो.विष्णुदास अंबर, रो. किरण क्षीरसागर, रो. सुरेश कदम, . जे.. रो. प्रशांत अपराध, रो. ॲड. स्वाती नळेगावकर, , ए.जे.रो. अतुल सोनी, रो.ॲड. अमोल गुंड, रो .गुरुराज डोंगरे, रो. पुष्कराज रोकडे यांच्यासह क्लबचे सदस्य उपस्थित होते.
रोटरी क्लब तुळजापूरला मिळालेल्या या सन्मानाबद्दल मनस्वी आनंद असून, भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम आणि सदस्यवाढीवर भर देत क्लब कार्यरत राहणार असल्याचे तुळजापूर रोटरी चे अध्यक्ष हंगरगेकर यांनी सांगितले..
0
0
6
3
2
6



