ई-पेपरक्रिडा व मनोरंजनसंपादकीय

एकादशीच्या निमित्ताने नगर परिषद क्र. २ कडून लक्षवेधी रिंगण सोहळा सादर, विद्यार्थी व शिक्षकांचे संस्कार भारती कडून अभिनंदन

वर्षभर विद्यार्थी वर्गाच्या कला गुणांना प्रशालेकडून प्रोत्साहन

0 0 6 3 2 6

न.प.प्रा.शा. क्र.२ येथे पंढरी दिंडी उत्सव उत्साहात साजरा

तुळजापूर (दि.२४) प्रतिनिधी

येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे आषाढी एकादशीची औचित्य साधून पंढरी दिंडी उत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आरंभी श्री तुळजाभवानी, विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्ती शिक्षक पांडुरंग गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी दिंडी काढून अभंग, भारुड, भजन तसेच संतांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी रिंगण ,फुगडी, दिंडीतील सांप्रदायिक गीते, नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी आषाढी वारीचे महत्व संत परंपरा तसेच राष्ट्रीय एकात्मता ,समता आणि सेवाभावाचा संदेश दिला. यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र कावरे,केरण लोहारे ,सुज्ञानी गिराम, विद्यादेवी स्वामी, अंगणवाडीच्या शितल गायकवाड, छाया पाटील,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर परिषद शाळा क्र. २ मध्ये वर्ष भर साजरे होणारे सॉस्कृतिक उपक्रम अत्यंत सुंदर होतात. विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील यासाठीचा समन्वय तसेच कल्पनाशक्ती कौतुकास्पद आहे असे उद्गार शहरातून प्राप्त होत असून यामुळे दुर्लक्षित समाजातील मुले व मुली शिक्षणाच्या प्रवाहात मनापासून आवडीने सहभागी आहेत असे तुळजापूर येथील दीर्घ काळ कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारती संघटनेने म्हटले आहे. या कामाबद्दल २०२५-२०२६ वर्षातील उपक्रमशील शाळा असल्याचे संस्था अध्यक्ष सौ. अपर्णाताई शेटे यांनी म्हटले आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे