क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र
धाराशिव येथील भोसले हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा ” वारकरी वेशभूषा स्पर्धा
आषाढी एकादशी निमित्ताने भरगच्च आषाढी सोहळा

0
0
6
3
2
6
आषाढी एकादशी निमित्त
भोसले हायस्कूल मध्ये वेशभुषा स्पर्धा जिल्हा संस्कार भारतीचे भरगच्च आयोजन
धाराशिव दि २४ प्रतिनिधी
शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भोसले हायस्कूल व धाराशिव जिल्हा संस्कार भारती संयुक्त विद्यमाने वेशभुषा स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये इ.५ वी २ तुकडी व ६ वी १ तुकडीतून १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विठ्ठल , रुक्मिणी , संत , वारकरी वेशभुषा करून स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परिक्षण सौ.पी.डी परतापुरे , श्रीमती पी.पी. मैत्रे यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस सौ.प्रेमाताई सुधीर पाटील होत्या , या प्रसंगी संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, संरक्षक प्रभाकर चोराखळीकर , प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे , उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , संस्कार भारती शहर संयोजक अनिल मालखरे , इ.७वी पर्यवेक्षक बालाजी गोरे , ६ वी पर्यवेक्षक राजेंद्र जाधव , ५ वी पर्यवेक्षक शेषनाथ वाघ यांच्या हस्ते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना संस्कार भारतीचे प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह , पुष्प देऊन गौरविण्यात आले . प्रथम रुक्मिणी कु. मनस्वी संतोष टेकाळे ५ वी ड , प्रथम संत चि. अभय शंकर देशमुख ६ वी अ , प्रथम वारकरी चि. गणेश सुर्यकांत कारंडे ५ वी ड गुणाक्रमे बक्षीस वितरण करण्यात आले .
याप्रसंगी संगीत शिक्षक महेश पाटील यांनी अंभगाचे गायन केले व विद्यार्थ्यांच्या मुखातून प्रशालेचा परिसर भक्ती मय होऊन गेला. हि स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षक एस .एच. जगताप , सुरज सपाटे शिक्षिका सौ. एस. एम.राऊत, सौ.डी.एल. कांबळे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले सुंत्रसंचालन संदीप जगताप यांनी केले तर आभार राजेंद्र जाधव यांनी मानले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संस्कार भारती धाराशिव वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कुटुंबातील व्यक्तींना वेशभूषा करण्यासाठी प्रोत्साहन देणारा अत्यंत सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.
0
0
6
3
2
6



