आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्र

तुळजापुरातील डॉ. श्याम होळकर यांचा छत्रपती संभाजीनगर येथे विशेष पुरस्काराने सन्मान

ॲक्युपंक्चर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल झाली पुरस्कारासाठी निवड, सर्व स्तरातून अभिनंदन चा वर्षाव...

0 0 6 3 2 6

तुळजापूरचे डॉ. शाम होळकर यांना ‘महा ॲक्युपंक्चर रत्न’ पुरस्कार,

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे छत्रपती संभाजीनगर येथे तुळजापुरातील आयुर्वेद डॉक्टरांचा सन्मान

तुळजापूर दिनांक 28 प्रतिनिधी

तुळजापूर येथील सुप्रसिद्ध ‘श्री तुळजाई आयुर्वेद, पंचकर्म व निसर्गोपचार केंद्रा’चे संचालक डॉ. शाम चंद्रकांत होळकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या ‘महा ॲक्युपंक्चर रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन’ (AIMA) च्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात १९ जुलै रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ॲक्युपंक्चर, निसर्गोपचार आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांना दिलेल्या उत्कृष्ट सेवांची दखल घेऊन डॉ. शाम होळकर यांची या राष्ट्रीय स्तरावरील मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास वैद्यकीय, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच राज्यभरातून आलेले तज्ज्ञ डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुर्वेद व निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यसेवा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या डॉ. शाम होळकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुळजापूर शहर व धाराशिव जिल्ह्यातून, तसेच वैद्यकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तुळजापूर येथील आयुर्वेद क्षेत्रात सेवा करणारे डॉक्टर श्याम होळकर हे धाराशिव तालुक्यातील कनगरा शिवाजीनगर येथील मूळ रहिवाशी असून काही वर्षापासून ते आयुर्वेदिक क्षेत्रात तुळजापूर येथे सेवा करीत आहेत त्यांच्या या पुरस्कारामुळे आयुर्वेद क्षेत्रात काम करणाऱ्या एका चांगल्या डॉक्टरांचा सन्मान झाल्याची भावना तुळजापुरात व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे