ई-पेपरमहाराष्ट्रसंपादकीय

मंदिराच्या विकास आराखड्याच्या यशस्वी होण्यासाठी वैदिक मंत्रोचारात संकल्प

तुळजाभवानी मंदिरात अमरराजे कदम, अनंत कोंडो, विपिन शिंदे यांना मिळाला संकल्प दिनी यजमान पदाचा मान

0 0 6 3 2 6

श्री तुळजाभवानी मंदिर व परिसर विकासासाठी  जीर्णोद्धार व विकासकामे निर्विघ्न पार पडण्यासाठी गुरुपौर्णिमेदिनी संकल्प

तुळजापुरातील तीन पुजारी मंडळाचे अध्यक्ष यना यजमान पदाचा मान

तुळजापूर दि २९ प्रतिनिधी

राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुळजापुरातील तीनही पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांना यजमानपद देऊन ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत संकल्प करण्यात आला.

​ तुळजाभवानी मंदिरातील प्रस्तावित जीर्णोद्धार व विकासकामे अत्यंत निर्विघ्न, शास्त्रोक्त आणि यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत, या पवित्र व सात्विक उद्देशाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर विशेष मंत्रपठण विधीचा मंगलमय प्रारंभ करून संकल्प सोडण्यात आला.
​या धार्मिक सोहळ्यांतर्गत गणपती अथर्वशीर्ष पारायणाचे मुख्य यजमानपद उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अनंत कोंडो व त्यांच्या धर्मपत्नी सौ . अश्विनी यांनी भूषवले. श्रीरुद्र जपाचे मुख्य यजमान म्हणून पाळकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. विपीन शिंदे व त्यांची धर्मपत्नी यांनी भुषवले. तसेच श्री दुर्गा सप्तशती पारायणाचा विधी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री. अमरराजे कदम व त्यांच्या धर्मपत्नी सौ. रोहिणी कदम यांच्या शुभहस्ते शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला.
​श्री तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण होईपर्यंत दररोज हे विशेष मंत्रपठण व अनुष्ठान अविरतपणे सुरू राहणार आहे.
​या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तथा तहसीलदार सौ. माया शिंदे, धार्मिक व्यवस्थापक श्री. अमोल भोसले, श्री. रामेश्वर वाले, सरकारी उपाध्ये श्री. बंडोपंत पाठक, मकरंद प्रयाग, श्रीराम आपसिंगेकर यांच्यासह परिसरातील वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणवृंद, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण मंदिर परिसर या मंत्रघोषाने व अध्यात्मिक चैतन्याने उजळून निघाला होता.

1/5 - (1 vote)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे