
0
0
6
3
2
6
अभियांत्रिकीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी महाद्वारात साखळी उपोषण
तुळजापूर दिनांक 4 डॉक्टर सतीश महामुनी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या देवस्थानाचा कोट्वधी रुपयाचा कारभार आहे, दररोज लाखो रुपये सोने चांदी देवीच्या दानपेटी मध्ये अर्पण होतात. याच मोठ्या देवस्थानच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मात्र अनेक वर्षापासून त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे. जी तुळजाभवानी माता लाखो भाविकांची श्रद्धास्थान प्रेरणास्थान आणि कुलदेवता आहे त्यात तुळजाभवानीच्या मंदिरासमोर या कर्मचाऱ्यांना उपोषण करावे लागले हे तुळजाभवानी देवस्थान आणि त्याच्या सर्व विश्वस्त मंडळाचे खूप मोठे अपयश मानले जात आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी सोमवारपासून महाद्वार परिसरात कुटुंबासह साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची वार्ता शहरात पसरताच नगरसेवकासह विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन विचारपूस केली .
शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोग लागू करून सेवानिवृत्ती दिनांकपर्यंतची फरक रक्कम अदा करणे, शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगानुसार सेवा उपदान व रजा रोखीकरण फरक रक्कम अदा करणे शासन निर्णयानुसार 12 व 24 वर्ष कालबद्ध पदोन्नती नुसार फरक रक्कम अदा करणे या व इतर मागण्यांचा यात समावेश आहे. या उपोषणात विलास भोसले, दत्ता जाधव, नंदू पाटील, चंद्रकांत ओवरीकर, विलास चाटूफुळे, गंगाधर मेथेकर, रवि दुरूगकर, अशोक रोचकरी, नागनाथ जाधव ,महादेव देशमुख, अनिल कुलकर्णी अनिल डोंगरे ,गोविंद खुरुद, विठ्ठल ढवळे व मंजुषा चाटुफुळे, छाया जाधव, अर्चना दुरुगकर ,कल्पना मेथेकर या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे.
उपोषणस्थळाला गटनेते औदुंबर कदम, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी ,नगरसेवक चंद्रशेखर भोसले, दिनेश क्षिरसागर, नरेश अमृतराव, रत्नदीप भोसले, माजी नगरसेवक सज्जनराव साळुंखे , विजय कंदले, रत्नदीप भोसले,
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीनाथ शिंदे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची सहानभुतीपूर्व चौकशी करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा मंदिर प्रशासनाने तात्काळ विचार करावा व त्यांना न्याय द्यावा असे मत व्यक्त केले.
सदर कर्मचारी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयुष्यभर सेवा केलेले आहेत. ज्या देवीच्या दरबारामध्ये लाखो भाविक आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्रद्धेने दर्शनासाठी येतात त्यास मंदिर संस्थांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची अवस्था आणि मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सारखे उच्चपदस्थ असताना सामान्य कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय हक्काच्या पेन्शन कामासाठी देवीच्या मंदिरासमोर उपोषण करावे लागते ही खूप मोठी शोकांतिका श्री तुळजाभवानी देवस्थान आणि त्याच्या विश्वस्त मंडळाची आहे, याप्रकरणी विश्वस्त मंडळाची दिशाभूल करणारे निर्णय यापूर्वी लेखा अधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेले असल्यामुळे या गोरगरीब कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या न्यायापासून प्रलंबित रहावे लागले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून या कर्मचाऱ्यांना खूप अपेक्षा असून यापूर्वी या प्रश्नाच्या अनुषंगाने तुळजापूर स्थानिक पत्रकाराकडून आमदार पाटील यांना वेळोवेळी यासंदर्भात विचारणा केली तेव्हा कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. अनेक वर्षापासून हे कर्मचारी आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी प्रयत्नशील असताना यांना का न्याय दिला जात नाही असा प्रश्न कर्मचारी वर्गाच्या कुटुंबीयांकडून विचारण्यात येत आहे.
” या प्रश्नावर माजी नगरसेवक आणि आमदार राणा जगजित सिंह पाटील यांचे अत्यंत विश्वासु सहकारी भाजप नेते माजी नगरसेवक विशाल रोचकरी यांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण निश्चितपणे आमदार महोदयांना सूचित करू आणि या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करून अशी माहिती मराठी समाचार शी बोलताना दिली. या साखळी उपोषणाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांनी ज्या भावना बोलून दाखवल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण आमदार महोदयांना देणार आहोत. नगराध्यक्ष विनोद गंगणे हे देखील विश्वस्त मंडळामध्ये असून आम्ही सर्वजण मिळून या कर्मचारी वर्गास निश्चितपणे न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले.
0
0
6
3
2
6


