ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित क्रीडा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद, श्लोक भोजने व श्रद्धा राठोड स्पर्धेत प्रथम…
बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या हस्ते प्रारंभ

0
0
6
3
2
6
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धेला चांगला प्रतिसाद
तुळजापूर ०४ दि प्रतिनिधी
माजी मंत्री, बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर येथे १०० मीटर धावणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
यामध्ये १०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये अनुक्रमे श्लोक भोजने (प्रथम), ओंकार भोसले (द्वितीय), इकबाल सय्यद (तृतीय) तर मुलीमधून १०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये अनुक्रमे कु. श्रद्धा राठोड (प्रथम), कु. अपर्णा माने (द्वितीय), कु. पायल लोंढे (तृतीय) यांनी नंबर मिळवला. विजेत्या स्पर्धकांचे प्रमाणपत्र देऊन बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगांवकर यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी माजी सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे, उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले, उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे, क्रीडा प्रमुख डॉ. अशोक कांबळे, डॉ. अंबादास बिराजदार, प्रा. प्रशांत अमृतराव, प्रा. आशिष हंगरगेकर, प्रा. राजेंद्र खेंदाड, प्रा. नितीन बिराजदार, डॉ. अभिजीत बाबरे, प्रा. अमर भरगंडे, प्रा. सत्यवान मुसळे, प्रा. रामलिंग थोरात, प्रा. गुलाब सय्यद, डॉ. शिवतेज भोसले, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
6
3
2
6


