आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्र

नगरपरिषद शाळा क्रमांक ३ मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची तपासणी

पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांची उपस्थिती....

0 0 6 3 2 6

‘निरोगी विद्यार्थी, सक्षम भविष्य’चा संकल्प!

तुळजापूर खुर्द येथील नगरपरिषद शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी; राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

तुळजापूर  दि ६ प्रतिनिधी

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३, तुळजापूर (खुर्द) येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत विद्यार्थ्यांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरात वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांच्या आरोग्यविषयक विविध बाबींचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, पत्रकार सतीश फत्तेपुरे, डॉ. प्रशांत वडणे, डॉ. संजीवनी करंजकर तसेच परिचारिका कापसे  उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य समस्यांचे वेळेत निदान होऊन त्यांना आवश्यक उपचाराची दिशा मिळत असल्याने हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे