ई-पेपरक्रिडा व मनोरंजन

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ ऑगस्टपासून

१६ ऑगस्ट ते रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होणार

0 0 6 3 2 6

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ ऑगस्टपासून

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी आज (दि. ७) लॉटस्‌ काढण्यात आले. स्पर्धेची सुरुवात ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या ‘तुती’ या एकांकिकेने होणार आहे. तर समारोप आय. एल. एस. लॉ कॉलेजच्या ‘हाईड अँड सीक’ या एकांकिकेने होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे ६१वे वर्ष असून स्पर्धेत ५१ महाविद्यालयांचा सहभाग आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात दिग्दर्शक आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत लॉटस्‌ काढण्यात आले. सुरुवातीस महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी स्पर्धेचे नियम, संहितांचे परिनिरिक्षण तसेच तांत्रिक मुद्द्यांबाबत माहिती दिली. अध्यक्ष अनंत निघोजकर, सुहास नांगरे, मंगेश शिंदे उपस्थित होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार, दि. १६ ऑगस्ट ते रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे.

OLYMPUS DIGITAL CAMERA

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे