ई-पेपरक्रिडा व मनोरंजन

सुगम संगीताचे सादरीकरण हे शास्त्रीय गायनाइतकेच अवघड असते – सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे

विदुषी कै. डॉ. सुजाता सुरेश नातू पुरस्कृत कथक नृत्य युवा कलाकार पुरस्कार आदिती देवधर, उत्कृष्ट संगतकार पुरस्कार तालवादक मंगेश करमरकर यांना प्रदान करण्यात आला. ग्रंथभेट, दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप

0 0 6 3 2 6

शास्त्रीय संगीताइतकेच ‘सुगम’ही अवघड : अनुराधा मराठे

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित मुक्त संगीत चर्चासत्र

पुणे : सुगम संगीताचे सादरीकरण हे शास्त्रीय गायनाइतकेच अवघड असते. सुगम संगीतात गाणे वाचून त्याचे योग्य उच्चारणही होणे महत्त्वाचे असून त्यात शब्द लांबविणे, मोकळ्या जागा भरणे, शब्दातून आर्तता दिसणे आवश्यक आहे. शास्त्रीय संगीत सादर करताना बंदिशींच्या शब्दाचा अर्थ, भाव आलापीतून प्रकट आला करता आला पाहिजे. अशा अनेक गोष्टी मी माझ्या गुरू आणि संगीतकारांकडून आत्मसात केल्या, अशा हृद्य भावना सुप्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांनी व्यक्त केल्या.

OLYMPUS DIGITAL CAMERA

गानवर्धन आणि व्हायोलिन अकॅडमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार तसेच संगीत विषयाच्या अभ्यासकांना सांगीतिक प्रबोधन करणारे सप्रात्यक्षिक व्याख्यान अर्थात मुक्त संगीत चर्चासत्राचे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अनुराधा मराठे यांनी ‘सुगम संगीतासाठी शास्त्रीय संगीत आणि इतर काही’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. त्यांच्याशी गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर यांनी संवाद साधला.

OLYMPUS DIGITAL CAMERA

व्हायोलिन अकॅडमीचे स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख पंडित अतुलकुमार उपाध्ये, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेत्री निर्मला गोगटे, स्वरानंदचे विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे, डॉ. शुभांगी बहुलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

संगीत क्षेत्रातील प्रथम गुरू डॉ. श्रीपाद नाईक यांच्यासह त्र्यंबकराव जानोरीकर, गजाननबुवा वाटवे, यशवंत देव, सुधीर फडके, प्रभाकर जोग, श्रीनिवास खळे, श्रीधर फडके, राम कदम, जयदेव, हृदयनाथ मंगेशकर या संगीतकारांबरोबर केलेल्या कार्याला अनुराधा मराठे यांनी उजाळा दिला. त्या पुढे म्हणाल्या, गुरू श्रीपाद नाईक यांनी गायनाविषयी शिक्षण देताना सर्वप्रथम ‘सा’ लावायला शिकविले. त्याच प्रमाणे ‘गंधारा’ची उंची जाणून घेणे, तंबोरे लावणे, तबला शिकविणे यासह रागातील व इतर पलटे देखील घोटवून घेत स्वरांतराची तयारी करून घेतली. याचा उपयोग दिग्गज संगीतकारांबरोबर काम करताना झाला. गायन करताना स्वरांवर आदळू नये, आवाजाची वैशिष्ट्ये ओळखून गावे तसेच स्वत:पुरते न गाता रसिकांना गाणे सांगणे जमले पाहिजे अशा अनेक गोष्टी मला दिग्गज संगीतकारांकडून शिकावयास मिळाल्या. प्राची देवल (सहगायन), माधवी करंदीकर (संवादिनी), विलास क्षीरसागर (तबला) यांनी साथ केली.

मुक्त संगीत चर्चासत्राविषयी प्रास्ताविकात माहिती देताना अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर म्हणाले, भारतीय संगीत वारसा पुढे नेत ही बौद्धिक संपदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आहे. प्रा. प्रकाश भोंडे, निर्मला गोगटे, पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी विदुषी कै. डॉ. सुजाता सुरेश नातू पुरस्कृत कथक नृत्य युवा कलाकार पुरस्कार आदिती देवधर, उत्कृष्ट संगतकार पुरस्कार तालवादक मंगेश करमरकर यांना प्रदान करण्यात आला. ग्रंथभेट, दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

निर्मला गोगटे यांचा नव्वदीनिमित्त आणि अनुराधा मराठे यांचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे स्वागत वासंती ब्रह्मे, सविता हर्षे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. नीलिमा राडकर यांनी सूत्रसंचालन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे