ई-पेपरक्रिडा व मनोरंजनसंपादकीय

तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि तालवाद्य कलेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टरेट (मानद डी. लिट.)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि तालवाद्य संगीत आणि ललित कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल

0 0 6 3 2 6

पुणे : कर्नाटकातील कलबुर्गी येथील श्री सत्यसाई युनिर्व्हसिटी फॉर ह्युमन एक्सलन्सकडून तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि तालवाद्य कलेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल संगीत आणि ललित कला क्षेत्रातील सन्माननिय डॉक्टरेट (मानद डी. लिट.) बहाल करण्यात आली. गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सत्य साई ग्राम, बेंगळुरू येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मैसूर-कोडागूचे खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराजा वडियार, श्री सत्य साई युनिर्व्हसिटी फॉर ह्युमन एक्सलन्सचे कुलपती सद्‌गुरू श्री मधुसूदन साई यांच्या प्रमुख उपस्थिती पदवी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  

अव्वल दर्जाचे तबलावादक म्हणून तालयोगी पंडित सुरेश तळवलकर अनेक पिढ्यांना गुरू या नात्याने मार्गदर्शन करीत आहेत. विविध घराण्यांच्या वैशिष्ट्यांचा सुंदर मिलाफ करत त्यात कर्नाटक संगीत तालशास्त्राचा अंतर्भाव करून त्यांनी संगीत साधना केली आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पंडित तळवलकर यांना मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली.

फोटो ओळ : तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करताना यदुवीर कृष्णदत्त चामराजा वडियार, सद्‌गुरू श्री मधुसूदन साई

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे