आरोग्य व शिक्षणई-पेपरराजकिय

आरक्षणाच्या अनुषंगाने ही अखेरची लढाई आहे, करो या मरो याप्रमाणे आगामी काळात हा लढा होईल – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील ll बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र

तुळजापूर तुळजाभवानीचे दर्शन आणि मराठा समाजाशी साधला संवाद

0 0 6 3 2 6

तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला केला प्रारंभ, जंगी स्वागत आणि घोषणाबाजी, मराठा समाजात उदंड उत्साह

आता या शेवटच्या लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे – मनोज जरांगे पाटील

तुळजापूर  दि 8 प्रतिनिधी डॉ. सतीश महामुनी

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चुकीचे काम केले आहेत त्याचे त्यांना फळ बघावे लागेल, आता होणारी लढाई ही अखेरची लढाई असून सर्वांनी या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापुरात केले. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक घराच्या उंबऱ्यापर्यंत आपला निरोप पोहोचवा, समाजाने सावध झाले पाहिजे मनोज जरांगे पाटील यांचा समाजाला सल्ला.

तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने ते तुळजापूर येथे आले होते तुळजाभवानीचे दर्शन घेऊन त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात करण्याचा संकल्प केला या निमित्ताने येथील मराठा बांधवांशी श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोर संवाद करताना संजय शिरसाठ आणि चंद्रशेखर बावनकुळे या दोन मंत्र्यांनी मराठा आरक्षणामध्ये जे अडथळे आणण्याचे काम केले आहे त्याचे पुरावे आमच्या जवळ आहेत. त्यांना त्यांची:  जागा दाखवू असा इशारा दिला.

तुळजाभवानी देवीचे दर्शन करण्याचा आणि मुक्काम करण्याचा व येथून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करण्याचा नियोजनाचा भाग होता परंतु तुळजापूर आणि धाराशिव येथील जबाबदार मराठा बांधवांनी एकत्र येऊन संवाद साधण्याचा केलेला प्रयत्न मराठा समाजासाठी लाखमोलाचा आहे अशी समज नांदेड जिल्ह्याला देखील आहे याचा उल्लेख मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाषणापूर्वी केला. तुळजाभवानीचे जाज्वल्य तीर्थक्षेत्र असणारे या नगरीमध्ये आपण जे बोलणार आहोत ते सत्य आणि समाजाच्या हिताचे बोलणार आहोत असे देखील जरांगे पाटील यांनी निक्षून सांगितले. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्यासाठी पत्र दिले नाही म्हणून आपण त्यांचे नाव घेणार नाही परंतु चंद्रशेखर बावनकुळे यांचे पत्र त्यांच्याच ऑफिसमध्ये सापडले आहे ते तिथूनच आम्हाला मिळाले आहे असे देखील जरांगे पाटील यांनी बजावून सांगितले.

तुळजाभवानी देवीचे पुजारी कुमार टोले यांनी मनोज जरांगे पाटील यांची देवीची पूजा केली आणि त्यांना हे भवानी माते  आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोज दादा यांना संपूर्ण यश दे असा आशीर्वाद दिला.  याप्रसंगी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक सज्जन साळुंखे, जिल्हाध्यक्ष  महेश गवळी, धैर्यशील  कापसे अर्जुन साळुंखे, अजय साळुंखे, जीवन राजे इंगळे, कुमार टोले, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे