ई-पेपरसंपादकीय

सबका साथ सबका विकास – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेला तुळजापुरात विसर…. विकास कामावर राजकारण…. महायुतीमध्ये निधीवरून आरोप प्रत्यारोप…. नगराध्यक्ष गंगणे व शिवसेना नेते मगर यांच्याकडे लक्ष

ओमराजे निंबाळकर आणि राणा दादा यांच्यातील विकासात्मक समन्वयाची आवश्यकता....

0 0 6 3 2 6

ओमराजे निंबाळकर आणि ऋषिकेश मगर यांनी आणलेल्या पाच कोटी निधी वरून पालिकेतील सत्ताधाऱ्याकडून आरोप

तुळजापूर दि १० डॉ. सतीश महामुनी

शिवसेना शिंदे गटाचे नेते ऋषिकेश मगर यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व विरोधी नगरसेवकाच्या जोरावर नगर विकास खात्याचा पाच कोटी रुपये विकास निधी आणल्यानंतर हा निधी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सत्ताधारी तुळजापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, गटनेते नगरसेवक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पार्टी तुळजापुरात सत्ताधारी असल्यामुळे राज्य पातळीवर सत्तेमध्ये असणारा शिंदे गट विकासात्मक निधीच्या जोरावर वेगळी चूल मांडत असल्याने आरोप प्रत्यारोपाला उधान आले आहे. वास्तवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा नारा देऊन देशातील सर्व घटकांना विकासात्मक कामामध्ये सहभागी करण्याचा संकल्प केलेला असताना तुळजापूर मध्ये मात्र सत्ताधारी पक्षांमध्येच असणाऱ्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटात या पाच कोटीच्या विकास निधीवरून कलगी तुरा सुरू झाला आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका नगराध्यक्ष विनोद गंगणे आणि शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांची राहणार आहे. या दोघांनी एकत्र येऊन निर्णय केला तर सत्ताधारी भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि सरकारकडून आलेला निधी तसेच शिंदे गटाने नगर विकास खाते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आणलेला निधी याची गोळा बेरीज एक होऊ शकते.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा दादा यांच्यात असणारे राजकीय वैर खूप जुने आणि सर्वपरिचित आहे. पवन राजे निंबाळकर हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील हे आरोपी होते परंतु नुकतीच या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना निर्दोष घोषित झाल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडेल असे सर्वांना वाटले होते परंतु तसे झाले नाही या दोघांमधील वैर अद्याप सुरूच आहे. याचीच लागण तुळजापूर नगर परिषदेच्या आणि नगरसेवकांच्या विकासात्मक निधी खर्चामध्ये आले आहे. याला कारण ठरले ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील पहिला विकास निधी तुळजापूर नगरपरिषदेला रुपये पाच कोटी मंजूर केला या प्रकरणावरून शिवसेनेचे स्थानिक नेते ऋषिकेश मगर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती दिली. यामध्ये नगरपरिषद या निधीच्या खर्चासाठी आणि प्रशासकीय कामकाजासाठी सहकार्य करेल की नाही याविषयी शंका व्यक्त करून जर गरज पडली तर हा निधी आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत खर्च करू अशी भूमिका श्री ऋषिकेश मगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली होती. त्यानुसार ९ ऑगस्ट रोजी सत्ताधारी नगरपरिषदेचे पदाधिकारी उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, गटनेते औदुंबर कदम, नगरसेवक सागर कदम, नगरसेवक लखन पेंदे, आदींनी पत्रकार परिषद घेऊन नगर विकास खात्याकडून मिळालेला पाच कोटी रुपये निधी हा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्याच्या हालचालीवर आक्षेप घेऊन नगरपरिषद तुळजापूर विकास काम करण्यासाठी सक्षम असताना अशा प्रकारची कृती करण्याचे काय कारण आहे असा प्रश्न विचारला आहे. सर्व निधी आणि विकास कामे नगरपरिषदेच्या माध्यमातूनच झाली पाहिजेत अशी भूमिका उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी व गटनेते औदुंबर कदम यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडली.

या प्रकरणामध्ये विनोद गंगणे आणि ऋषिकेश मगर राजकारण वगळता खूप चांगले स्नेही आहेत परंतु या निधीच्या आणि नगरपरिषद निवडणुका दरम्यान घडलेल्या काही घटना घडामोडीमुळे त्यांच्या या मैत्रीला देखील गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. वास्तवात आज तुळजापूर तीर्थक्षेत्र म्हणून असणाऱ्या शहराला विकासात्मक कामाची खूप मोठी गरज आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक मोठ्या योजना मंजूर झाल्या असल्या तरी त्याचा उपयोग शहरवासीयांना आणि भाविक भक्तांना झालेला नाही हे बाब सर्वांनाच माहित आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर तातडीने राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळून विकास कामांना गती प्राप्त होईल असे मानले जात होते परंतु नगरपरिषदेला निधी मिळण्यासाठी होत असलेला विलंब हा सर्व नगरसेवकांना चिंतेचा विषय वाटतो आहे या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर आणि ऋषिकेश मगर यांच्या खास प्रयत्नांमधून मिळालेले पाच कोटी रुपये विकासाचा पैसा नगर परिषदेकडून खर्च न करता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून खर्च करण्याचा घाट घातला गेल्यामुळे नगरपरिषदेच्या नगरसेवकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे दरम्यान या सर्व परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आणि विश्वास विनोद गंगणे आणि ऋषिकेश मगर यांच्यामध्ये आहे या दोघांनी तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक प्रभागाला समान न्याय देण्याच्या उद्देशाने एकत्र येऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाप्रमाणे आपल्या शहराचा विकास आणि नागरिकांचा विकास करण्यासाठी सर्व मतभेद बाजूला करून एकत्र यावे अशी जनमानसाची भावना आहे. सर्व नगरसेवकांना देखील हेच वाटते आहे कारण विनोद गंगणे आणि ऋषिकेश मगर यांनी कोणताही निर्णय घेतला तर दोन्ही बाजूचे नगरसेवक त्यांना पाठिंबा देतील अशी परिस्थिती दिसून येते आहे.

गेलेला दिवस येत नाही गेलेला महिना येत नाही आणि गेलेले वर्ष देखील पुन्हा येत नाही हे लक्षात घेता नगरपरिषदेचे राजकारण नगरपरिषदेच्या निवडणुका आणि या दरम्यान झालेला खर्च या सगळ्यांचा मेळ घालण्यासाठी आज नगरसेवकांची तारेवरची कसरत सुरू आहे या सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला तर शहराच्या विकासाला गती देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा दादा यांनी देखील या विकास प्रश्नाच्या अंमलबजावणीसाठी आणि तुळजापूरचा विकास वादावादी न करता पुढे जाण्यासाठी एकत्र येण्याची मोठी गरज आहे आवश्यकता आहे आणि त्याशिवाय विकासात्मक वाटचालीला गती प्राप्त होणार नाही असे वास्तव आहेत. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असणारे या नगरीला अनेक वर्षापासून मोठमोठ्या घोषणा झालेले आहेत राज्य सरकारने 1865 कोटी रुपये चा विकास निधी देखील घोषित केलेला आहे याशिवाय 58 कोटी रुपये खर्च करून तुळजाभवानी मंदिराचा जिर्णोद्धार आणि विकास हाती घेतलेला आहे. लवकरच सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्ग सुरू होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकर आणि ऋषिकेश मगर विशेष निधी मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करीत आहेत. नगराध्यक्ष विनोद गंगणे हे देखील कुशल संघटक आणि तुळजापूर शहरावर अनेक वर्ष आपली सत्ता कायम ठेवून आपल्या सर्व नगरसेवकांना पाठबळ देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते या सर्वांच्या माध्यमातून तुळजापूरच्या विकासाला वादावादी न करता सहमतीने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात सुरू करावे आणि त्याला गती द्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे. आगामी काळात विनोद गंगणे आणि ऋषिकेश मगर तसेच ओम दादा आणि राणा दादा यांच्या दरम्यान असणारे वैर आणि गैरसमज कधी दूर होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे