क्रिडा व मनोरंजनदेश-विदेश

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पाच फिल्म क्लब करण्याचा संकल्प

जेष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल ज्या वेळेस फेडरेशनचे अ. भा. अध्यक्ष ; 15 ऑगस्ट पासून अभियानास सुरुवात

0 0 6 3 2 6

जेन झी आणि जेन अल्फा’ यांना आता महाराष्ट्रभर दर्जेदार चित्रपटांचे दिले जाणार संस्कार!

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ( पश्चिम विभाग ) चे उपाधक्ष वीरेंद्र चित्राव यांची घोषणा

100 कॅम्पस फिल्म सोसायटीज स्थापन करण्याचा निर्धार

15 ऑगस्ट पासून अभियानास सुरुवात

फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ( पश्चिम विभाग ) च्या कार्यकारिणीची मिटिंग नुकतीच झाली. ‘जेन झी आणि जेन अल्फा’ यांना आता महाराष्ट्रभर दर्जेदार चित्रपटांचे संस्कार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यात घेण्यात आला. स्वातंत्रदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट पासून या अभियानास सुरुवात करण्यात येईल.

पुढील महिन्यात कलकत्ता येथे होणाऱ्या अ. भा. बैठकीत हा मुद्दा आग्रहाने मांडून, हा उपक्रम देशभर पोहोचविण्यासाठी सक्रीय होण्यात येईल, अशी माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

जेष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल ज्या वेळेस फेडरेशनचे अ. भा. अध्यक्ष होते त्याच वेळी हा विचार पुढे आला होता. करोना काळामुळे मागे पडलेला हा विषय आता निर्धारपूर्वक पुढे नेण्यात येईल.

या उपक्रमा अंतर्गत कॉलेज व्यवस्थापन व प्राचार्य यांच्या परवानगीने कॅम्पस फिल्म क्लब स्थापन करण्यात येईल. सर्व विद्यापीठे यात सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फिल्म क्लब स्थापन करण्यास मान्यता दिली असून लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

सर्व फिल्म क्लब तरुण सदस्यांना अनेकविध कार्यक्रम देण्यात येणार आहेत. एफ. टी. आय. आय.च्या सहकार्याने चित्रपट रसास्वाद शिबीर, वेगवेगळ्या विषयांवर छोटे – मोठे देश – विदेश चित्रपटांचे महोत्सव, चित्रपटानंतर मुक्त चर्चा, लघुपट – अनुबोध पट महोत्सव, चित्रपट विषयक पुस्तक व पोस्टर प्रदर्शन इ. अनेक उपक्रमांनी ‘जेन झी आणि जेन अल्फा’ यांना ‘visual literacy’ चा आस्वाद देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पाच फिल्म क्लब करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 3 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे