स्वरसुधा’तर्फे संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने सुप्रसिद्ध सतार व सूरबहारवादक पंडित संतोष बॅनर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘सूर संतोष संगीत सुधा’ या गायन-वादन मैफलीचे आयोजन
पंडित संतोष बॅनर्जी यांच्या कन्या व शिष्या सहाना बॅनर्जी यांचे सतार वादन

पंडित संतोष बॅनर्जी स्मृतिप्रित्यर्थ ‘सूर संतोष संगीत सुधा’ मैफलीचे आयोजन
पुणे : ‘स्वरसुधा’तर्फे संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने सुप्रसिद्ध सतार व सूरबहारवादक पंडित संतोष बॅनर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘सूर संतोष संगीत सुधा’ या गायन-वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सांगीतिक मैफल शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात होणार आहे. यात पंडित संतोष बॅनर्जी यांच्या कन्या व शिष्या सहाना बॅनर्जी यांचे सतार वादन होणार असून सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांची गायन मैफल आयोजित करण्यात आली आहे. कलाकारांना पंडित भरत कामत, महेशराज साळुंके (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. या निमित्ताने पंडित संतोष बॅनर्जी यांच्या सांगीतिक कार्याविषयी माहिती देणारा ‘सूरसाधना : अ जर्नी ऑफ अ मेलोडिक सेंट’ हा मृण्मय नंदी दिग्दर्शित लघुपट दाखविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन मृणाल आठले करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : सहाना बॅनर्जी, पंडित रघुनंदन पणशीकर


