जवळगा मे. जिल्ह्यात प्रथम, तृतीय क्रमांक वडाचा तांडा ग्रामपंचायतीस
ग्रामसेवक विनेश कांबळे ठरले ५ पुरस्काराचे मानकरी
तुळजापूर दि 14 डॉक्टर सतीश महामुनी
राज्य शासनाने महिला सक्षमीकरण होण्यासाठी आयोजित केलेल्या आदिशक्ती अभियानामध्ये तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई गावाने क्रांतिकारक यश प्राप्त केले असून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून जवळगा मेसाई वडाचा तांडा आणि काक्रंबा ग्रामपंचायतचे मोठे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजाभवानीच्या तालुक्याला राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत आदिशक्ती अभियानामध्ये जिल्हास्तरावर जवळगा मेसाई ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक व जिल्ह्यात तृतीय क्रमांक वडाचा तांडा ग्रामपंचायत ने पटकावला आहे. या स्पर्धे अंतर्गत तुळजापूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक जवळगा मेसाई ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक वडाचा तांडा, तृतीय क्रमांक काक्रंबा ग्रामपंचायत यांना मिळाला आहे. विजेत्या ग्रामपंचायतीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील, सीडीपीओ किशोर गोरे, गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी अभिनंदन केले आहे.
सन 2025 – 2026 या वर्षांमध्ये राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आदिशक्ती अभियानांतर्गत राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींना महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने भरीव कार्य करण्यासाठी आदिशक्ती पुरस्काराचे आयोजन केले होते या पुरस्काराच्या निवडीनंतर आदिशक्ती तुळजाभवानीच्या तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम आणि तृतीय क्रमांक पटकावून आपला डंका वाजवला आहे. या काळात ग्रामपंचायत जवळगा मेसाई च्या सरपंच प्रशासक पदी नामदेव निकम, वडाचा तांडा ग्रामपंचायत प्रशासक पदावर ए.सी. वाळके व जे. जी. नाईक तसेच काक्रंबा ग्रामपंचायत वर सरपंच म्हणून कालिदास खताळ आणि उपसरपंच सुमित घोगरे , तीनही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक म्हणून विनेश शिवाजीराव कांबळे यांनी कामकाज केलेले आहे. लवकरच मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण मंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील दृष्टीने अत्यंत अभिमानाची आणि गौरवास्पद कामगिरी जवळगा मेसाई वडाचा तांडा आणि काक्रंब या तीन ग्रामपंचायतीने तुळजापूर तालुक्यात केलेली आहे. या कामकाजामध्ये गाव पातळीवर काम करणाऱ्या सरपंच कालिदास खताळ, उपसरपंच सुमित घोगरे, अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्ती, पोलीस पाटील, महिला बचत गटाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग, गावातील किशोरवयीन मुली आणि महिला या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यामुळे राज्यस्तरावर आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्याला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशानंतर तीनही ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
प्रतिक्रिया
ही स्पर्धा खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे, यामुळे काम करण्यास प्रेरणा मिळाली, जवळगा मे., वडाचा तांडा आणि काक्रंबा ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
# वडाचा तांडा या ग्रामपंचायतीने या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आदिशक्ती पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद झाला आहे या निमित्ताने सर्व गावकऱ्यांचे आपण अभिनंदन करतो आहोत, अशा अभियानासाठी राज्य शासनाने निधी जास्तीचा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
– लखन चव्हाण ग्रामपंचायत सदस्य वडाचा तांडा
# महिला सक्षमीकरणासाठी मिळालेला आदिशक्ती पुरस्कार खऱ्या अर्थाने तुळजाभवानी देवीचा प्रसाद आहे. आगामी काळात महिलांना मिळणारा मानसन्मान मोलाच आहे
नको ती चर्चा बंद करा… कोणकोणत्या गोष्टीवर महाराष्ट्रात राजकारण होते, पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मांस विक्रीचे राजकारण पेटले…
2 weeks ago
नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते अमोल कुतवळ यांची महाविकास आघाडीच्या वतीने न्यायालय बस स्टॉपची केली मागणी
2 weeks ago
श्रावणाच्या मंगलमय वातावरणात धाराशिव येथे भव्य मंगळागौर महोत्सव , पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील व लेडीज क्लब वतीने आयोजन
2 weeks ago
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राणा दादांचे प्रयत्न, जिल्ह्यातील खरीप संकटात; शासनाला अहवाल सादर करा शास्त्रज्ञ, कृषी व महसूल अधिकाऱ्यांच्या पथकांकडून तातडीने पाहणी करा – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
2 weeks ago
भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांत तुळजापूर बैठकीत ८ ठराव मंजूर, मराठवाडा वॉटर ग्रीड पाणी योजना जलद गतीने पूर्ण करण्याची मागणी
3 weeks ago
काँग्रेस आणि राहुल गांधी योग्य भूमिकेत, कॉकरोच जनता पार्टी काँग्रेसच्या पथ्यावर, 2029 मध्ये राहुल गांधींचा फैसला होणार
3 weeks ago
२९ ऑगस्ट रोजी तुळजापुरात रा. स्व. संघाचे वतीने रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
3 weeks ago
रायगड जिल्ह्यातील महाड चे तहसीलदार महेश शितोळे यांचा तुळजाभवानी दर्शनानंतर सत्कार
4 weeks ago
हा केवळ पक्षप्रवेश नाही, तर कळंबच्या विकासासाठी भाजपाच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेला अढळ विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकसित भारत साठी कळंबकरांचा विश्वास आहे – रवींद्र चव्हाण
4 weeks ago
पालिकेची गटनेते अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सुचवलेल्या विकास कामाचे १५ दिवसात सुरू करण्याचे आव्हान