ई-पेपरमहाराष्ट्र
धाराशिव येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांच्या. कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद
महिलांची मोठी उपस्थिती

0
0
6
3
2
6
माहेरच्या मायेचा… सासरच्या नात्यांचा… आणि बहिणींच्या स्नेहाचा सुंदर उत्सव!
श्रावणातील मंगळागौरी म्हणजे प्रत्येक माहेरवाशीण लेकीसाठी जिव्हाळ्याची आठवण…माहेरच्या अंगणात पुन्हा एकदा बालपण फुलवणारा, सख्यांच्या हास्याने आणि प्रेमाने मन भरून टाकणारा सुंदर सण!
याच प्रेमळ भावनेतून डॉ. सौ. साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरी महोत्सवानिमित्त ‘अगं आई… अहो आई!’ या चित्रपटाचे तेर येथे विशेष सादरीकरण आयोजित करण्यात आले होते. आई-मुलगी, सासू-सून, बहिणी-बहिणी आणि कुटुंबातील प्रेमाची नवी नाती सांगणारा हा सुंदर सोहळा म्हणजे माहेरच्या मायेचा आणि कुटुंबाच्या आपुलकीचा एक अविस्मरणीय उत्सव!
श्रावणाच्या या मंगलमय वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत, मनमुराद हसत आणि आपल्या जिवलगांसोबत मंगळागौरीचा आनंद मनापासून साजरा केला!
0
0
6
3
2
6


