राज्य सरकारने दिलेल्या ५ कोटींच्या निधी वरून तुळजापुरात कलगीतुरा, गटनेते अमोल कुतवळ यांनी दिले आव्हान
गरज पडली तर उपोषणाचा मार्ग करू आंदोलन करू
तुळजापूर दिनांक 18 डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला ५ कोटी रुपयांचा निधी उपयोगात आणून प्रभागाचा विकास करण्याऐवजी सत्ताधारी नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्याकडून नगरपरिषद फंडामधून ही विकास कामे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे ही विकास कामे पंधरा दिवसात सुरू करून दाखवावीत असे आव्हान कॉंग्रेसचे नेते अमोल कुतवळ यांनी पत्रकार परिषदेमधून दिले आहे.
तुळजापूर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कुतवळ यांच्यासह नगरसेवक आनंद जगताप, किरण कदम-चिवचिवे, चिन्मय मगर, सुदर्शन वाघमारे, रणजीत इंगळे, अक्षय परमेश्वर – कदम आदी उपस्थित होते.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक ७, ८, ९ आणि १० मधील नागरी सुविधांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे काँग्रेस नगरसेवकांनी सांगितले. या निधीतून होणाऱ्या कामांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
काँग्रेस नगरसेवकांनी ३० जून रोजी शहरातील विविध ३६ मूलभूत विकासकामांचे निवेदन दिले होते. त्यापैकी २८ कामांना मंजुरी मिळून निधीची तरतूद झाल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.
५ कोटींच्या विकास निधीवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना या कामांमध्ये राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे, याउलट पंधरा दिवसांमध्ये आम्ही सुचवलेल्या विकास कामाची सुरुवात करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेमध्ये गटनेते अमोल कुतवल यांनी केली आहे.