ई-पेपरक्रिडा व मनोरंजन
दयावान गणेशोत्सव अध्यक्षपदी सुरज गायकवाड यांची निवड, यंदाच्या वर्षी राजहंसावर गणपती विराजमान होणार…
दरवर्षी सर्वात मोठी गणेश मूर्ती उभारण्याचा या मंडळाचा आहे विक्रम

0
0
7
0
4
7
राजहंसावर विराजमान होणार गणराया; दयावान युवा मंचाचा वर्गणीमुक्त गणेशोत्सव!
तुळजापूरात यंदा उत्सवाचे २१ वे वर्ष; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा मंडळाचा निर्णय
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील वर्गणीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या दयावान युवा मंचाच्या वतीने यंदा गणेशोत्सवाचे २१ वे वर्ष असून, पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राजहंस पक्षावर विराजमान गणेशमूर्ती हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
दयावान युवा मंचाच्या वतीने गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी दि. १३ ऑगस्ट रोजी संस्थापक अध्यक्ष मिथुन पोपळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत उत्सवाचे नियोजन, विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम तसेच महिलांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.
◾महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ची रंगत
गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महिलांना विविध मनोरंजक खेळ व स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार असून, विजेत्यांना संसारोपयोगी साहित्याची बक्षिसे देण्यात येणार आहेत. तब्बल दीड लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिस या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
◾वर्गणीमुक्त उत्सवाची २१ वर्षांची परंपरा
दयावान युवा मंचाने गेल्या दोन दशकांपासून वर्गणीमुक्त पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जपली आहे. यंदाही कोणाकडूनही वर्गणी न घेता उत्सव साजरा करण्याचा मंडळाचा संकल्प असून,धार्मिक परंपरेसोबत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे.
बैठकीत अध्यक्षपदी सुरज गायकवाड, उपाध्यक्ष कुलदीप गरड, सचिव दिदार सय्यद, कोषाध्यक्ष बाजीराव शिंदे यांच्यासह संस्थापक अध्यक्ष मिथुन पोपळे, कार्याध्यक्ष कुणाल रोंगे व दादाराव भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले.
उत्सवाचे पावित्र्य जपण्याचे काम मंडळ करत असल्याचं मंडळाचे आधारस्तंभ विजय कंदले व आनंद कंदले , पंकज पाटील, जगदिश पाटील आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मिथुन पोपळे यांनी सांगितलं.
राजहंसावर विराजमान गणरायाचे दर्शन आणि महिलांसाठी होणाऱ्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची तुळजापूरकरांना उत्सुकता लागली आहे.
0
0
7
0
4
7



