ई-पेपरक्रिडा व मनोरंजन

तुळजाई सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी नानासाहेब भोजने, मंडळाचे ३८ वे अध्यक्ष

यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये महिलांचा मोठा सहभाग, वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे तुळजापूर खुर्द येथे आयोजन

0 0 7 0 4 6

महाराष्ट्रशासन दलित मित्र पुरस्कार प्राप्त तुळजापुर खुर्द

तुळजाई मंडळाचा अनोखा उपक्रम गणेश मंडळ कार्यकरणी मध्ये महिलांना स्थान*

तुळजापूर – तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतीक व क्रीडा मंडळाची गणेशोत्सव २०२६ साठी मंडळाचे जेष्ठ सभासद श्री खंडू ताटे सर यांच्या अध्यक्षतेखाली ३८ वी सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांस्कृतीक व सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले असुन सदरील सर्व कार्यक्रम मंडळाच्या प्रथेप्रमाणे विनावर्गनी मंडळाच्या सदस्यांच्या मदतीतुनच आयोजीत करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले यावर्षी प्रति वर्षाप्रमाणे रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, किर्तनसेवा, भारुडसेवा, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजन, नागरिकां साठी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन, तसेच पशुवैद्यकिय शिबीर, महिलांसाठी खास मोदक स्पर्धेचे आयोजन यावर्षी प्रथमच केले जाणार आहे मंडळाचे हे ३८ वे वर्ष आहे.

सभेच्या सुरवातीस २०२६ वर्षीच्या गणेश उत्सव समितीचे गठण करण्यात आले यामध्ये अध्यक्षपदी श्री नानासाहेब भोजने यांची निवड करण्यात आली उर्वरीत कार्यकरणीमध्ये उपाध्यक्ष श्री सूरज जगदाळे सचिवपदी विकास भोजने सहसचिव विवेक माहुले व रविकिरण शेरेकर तर कोषाध्यक्षपदी श्री धीरज देशमाने व श्रावण डोके यांची नियुक्ती करण्यात आली कार्यकारणी सदस्यम्हणून श्री साबळे हाणमंत शेख मुक्तार,माळी दिपक,ठेले रामेश्वर तसेच महिला सदस्य म्हणून सौ.देशमाने गायत्री सौ.साबळे सरिता सौ.भोजने वैशाली व सौ ठेले संजना यांची निवड सर्वानुमते करण्यात आली या सभेस मंडळाचे जेष्ठ सदस्य नगरसेवक पंडितराव जगदाळे, तुळजाई पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने तुळजाई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री अदिनाथ ठेले सचिव संजय ढवळे प्रा निलेश एकदंते सर, धनंजय कुंभार, डॉ गोपिनाथ भोजने, संजय व्हटकर, दुर्वास भोजने , संजय देशमाने,रफिक शेख प्रमोद क्षीरसागर व मंडळाचे बहुतांश सभासद हजर होते.
तुळजाई मंडळास गतवर्षी महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आहे मंडळाच्या वतीने गतवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले यामध्ये विशेष म्हणून जेष्ठाना आधार काठीचा म्हणत गावातील सर्व जेष्ठाना काठी वाटप , सर्प मित्र यांना सुरक्षा स्टिक , १११ जेष्ठ नागरिकांना रेडिओ वाटप करण्यात आले होते तसेच मिळालेल्या पुरस्कार रकमेतून जिजामाता प्रशाला तुळजापूर या प्रशालेस साउंड सिस्टीम संच भेट देण्यात आला होता.

5/5 - (1 vote)

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 0 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे