
0
0
7
0
4
7
प्रस्तावित तुळजापूर हवाई धावपट्टी जागेची पाहणी
भारतीय विमान प्राधिकरणाकाकडून धाराशिव विमानतळाचीही पाहणी, आमदार जगजीतसिंह पाटील यांच्यासह तज्ञ उपस्थित
तुळजापूर दिनांक 23 डॉ. सतीश महामुनी
धाराशिव जिल्ह्याचे नेते आमदार आणि राज्य शासनाचा विकासात्मक प्रमुख उपक्रम असणाऱ्या मित्राचे उपाध्यक्ष राणा जगजीत सिंह पाटील यांनी विमानतळ होण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा परिसराला भेट दिली. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मोठे प्रकल्प प्रत्येक तालुक्यात उभे राहावेत या महत्त्वकांक्षीच्या निमित्ताने आपण काम करत असून नवे प्रस्ताव आणि नव्या मंजुरी जिल्ह्याला मिळत आहेत या सर्व प्रयत्नांमधून सामान्य माणसाचे जनजीवन सुधारणे आणि त्याचे दरडोई उत्पन्न वाढविणे याकडे असा विश्वास आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी विमानतळाच्या जागा पहाणीच्या निमित्ताने अनौपचारिक रित्या बोलताना व्यक्त केला आहे.
जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देण्याच्या उद्देशाने तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या चार किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पाहणी केली. पाहणीनंतर या पथकाने तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाच्या जागेबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाची आणखी एक पाऊल पुढे पडले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर केंद्र व राज्य सरकारकडून भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी माळुंब्रा येथे तारा प्रकल्पासह हवाई धावपट्टी उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पासाठी मागील काही महिन्यानपासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित धावपट्टीची जागा राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाच्या सलग्न असल्याने मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क, दळणवळणाच्या दृष्टीने या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. कृषी मालाची जलद वाहतूक, औद्योगिक गुंतवणुकीला चालना तसेच तुळजापूर आणि परिसरातील पर्यटनविकासासाठी ही धावपट्टी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात साकारला जाईल. त्यानंतर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला तसेच दरडोई उत्पन्नवाढीसही मोठा हातभार लागणार असल्याची अपेक्षा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.
या पाहणीमध्ये भारतीय विमान प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर रोशन कांबळे, अनुराग मिश्रा, संजय उके, सुशिल वर्मा, प्रदीप मौर्या, संतू दास आणि राजेश जीवन यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे, महापारेषणच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता गायत्री काळे, उमेश मेहरे, बांधकाम विभागाचे उपअभियंता आवाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित हवाई धावपट्टी आणि धाराशिव विमानतळाचा नियोजित विकास यामुळे जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवे बळ मिळण्यासोबतच कृषी, उद्योग, पर्यटन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे अपेक्षा आहे.
धाराशिव विमानतळ येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र
माळुंब्रा येथील पाहणीनंतर भारतीय विमान प्राधिकरणाच्या शिष्टमंडळाने धाराशिव येथील हवाई धावपट्टीचीही पाहणी केली. या धावपट्टीची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय धाराशिव विमानतळावर मिलिटरी ड्रोनच्या चाचण्या घेणे, भविष्यात ड्रोन निर्मिती तसेच संशोधन केंद्र विकसित करण्याचेही प्रस्तावित आहे. त्यामुळे माळुंब्रा येथील प्रस्तावित धावपट्टीसोबतच धाराशिव विमानतळाच्या विकासातून जिल्ह्यात विमान वाहतूक, ड्रोन तंत्रज्ञान आणि संबंधित उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
जेव्हा राणा जगजीतसिंह पाटील राज्य आणि केंद्र शासन यांच्याकडून प्रस्ताव देणे आणि त्याची मंजुरी आणू नये याविषयी प्रसार माध्यमाला माहिती देतात तेव्हा विरोधी पक्षाकडून या सर्व प्रयत्नांची खिल्ली उडविली जाते, प्रसार माध्यमांमध्ये देखील याच अनुषंगाने शंका कुशंका उत्पन्न होतात परंतु राणादाराच्या माध्यमातून होत असलेले नवे प्रस्ताव आणि नव्या मंजुरी याचा उपयोग भविष्यात आणि पुढच्या पिढीसाठी होणार आहे.
0
0
7
0
4
7



