देश-विदेशमहाराष्ट्र

रायगड जिल्ह्यातील महाड चे तहसीलदार महेश शितोळे यांचा तुळजाभवानी दर्शनानंतर सत्कार

तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांची उपस्थिती

0 0 7 0 4 4

आई तुळजाभवानीच्या चरणी महाडच्या तहसीलदारांचे साकडे; सहकुटुंबानी घेतले मातेचे दर्शन

‘तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळते’ — तहसीलदार महेश शितोळे

तुळजापूर : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्याचे तहसीलदार महेश शितोळे यांनी सहकुटुंब तुळजापूर येथे येऊन महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे विधिवत दर्शन घेतले. मातेच्या दर्शनाने मनाला समाधान आणि नव्या उर्जेची अनुभूती मिळते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तहसीलदार महेश शितोळे यांनी कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन मातेच्या चरणी नतमस्तक होत विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी मंदिरातील धार्मिक परंपरेनुसार पुजारी बाळासाहेब भोसले यांनी विधिवत पूजा केली.

दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी तेरखेडे, तसेच तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर तालुक्यात कार्यरत तलाठी गोरोबा तोडकरी आणि कार्यकारी सोसायटी चेरअरमन नागेश कोल्हे यांच्या उपस्थितीत तहसीलदार महेश शितोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना आई तुळजाभवानी मातेची प्रतिमा, मातेच्या चरणस्पर्शाने पावन झालेला प्रसाद, हळद-कुंकू देऊन सन्मानित करण्यात आले.

‘आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर ऊर्जा मिळते’, असे सांगत महेश शितोळे यांनी . तुळजाभवानी मातेच्या दर्शनाचा अनुभव व्यक्त केला. मातेच्या कृपाशीर्वादाने सर्वांना सुख, समाधान आणि समृद्धी लाभावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

महाडच्या तहसीलदारांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 0 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे