आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्र
२९ ऑगस्ट रोजी तुळजापुरात रा. स्व. संघाचे वतीने रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
श्रीनाथ मंगल कार्यालय येथे आयोजन

0
0
7
0
4
4
२९ ऑगस्ट रोजी तुळजापुरात करियर मार्गदर्शन मेळावा
तुळजापूर दिनांक २६ प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुळजापूर यांच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता श्रीनाथ मंगल कार्यालय येथे युवा भारत संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून याला जास्तीत जास्त तरुणांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक शिवा महामुनी व शहाजी जगदाळे, जगदीश पलंगे यांनी केले आहे.
या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या करिअरच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी नव्या संधी आणि उज्वल भविष्याची दिशा या विषयावर विभागीय रोजगार समन्वय समिती छत्रपती संभाजीनगर गणेश चादरे यांचे मार्गदर्शन असून अध्यक्षस्थानी लातूर विभाग प्रचारक राजेश संन्याशी हे उपस्थित आहेत. तुळजापूर तालुक्यातील सर्व महाविद्यालयीन आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी श्रीनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0
0
7
0
4
4



