
0
0
7
0
4
4
अखेर.राहुल गांधी विरोधी पक्षनेते भूमिकेत, भारतीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाकडे मोठी जबाबदारी
जागतिक पातळीवर प्रभाव टाकणारे केंद्रातील भाजप सरकार, 2029 लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्षाकडून मुसंडी
तुळजापूर / मुंबई दि २९ डॉ. सतीश महामुनी
2014 वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रामध्ये सत्ताधारी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला देशामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागली, परंतु 2025 वर्षापर्यंत सुमारे 11 वर्ष काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षाचा चेहरा पक्का करता आला नाही, 2026 मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून देशा मध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये उभारलेल्या विद्यार्थी आंदोलन आणि इतर नागरिकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आल्याचे निदर्शनास आले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधाला धार मिळाल्यामुळे काँग्रेस पक्ष हा विरोधी पक्ष म्हणून जनमानसामध्ये आपली भूमिका निर्माण करण्यामध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. 
प्रदीप काळ देशाच्या स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाने देशावर राज्य केले सुमारे 70 वर्ष काँग्रेस पक्षाने देशाची प्रगती देखील केली. 2014 पर्यंतचा भारताचा चेहरा आणि सत्ता काँग्रेसने कायम ठेवली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या माध्यमातून पहिला पंतप्रधान देशाला काँग्रेसने दिला त्यानंतर वेगवेगळ्या पंतप्रधानाच्या कार्य काळामध्ये देशाने निश्चितपणे प्रगती केली आहे. प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देखील उल्लेखनीय काम केलेले आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि देशातील जनता विशेषता कृषी क्षेत्राला देखील काँग्रेस पक्षाने आपल्या परीने आकार दिलेला आहे. परंतु नंतरच्या काळात काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात व्यक्ती केंद्रित राजकारण झाल्यामुळे आणि मोजक्या लोकांच्या हातात काँग्रेसची सत्ता कायमस्वरूपी राहिल्यामुळे हा पक्ष केवळ मूठभर लोकांचा होऊन यामध्ये पक्षाचे न भरून निघणारे नुकसान झाले.
2014 मध्ये तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे नेते आणि फायर ब्रिगेड नेते ज्यांनी 2014 च्या निवडणुकीमध्ये शक्तिशाली प्रचार करून काँग्रेस पक्षाचा पराभव करून दाखवला, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. परंतु हा धक्का एवढा मोठा होता की काँग्रेसला तो सहन झाला नाही. प्रचंड मोठे झालेले काँग्रेसचे नेते या धक्क्यामधून पक्षाला सावरणे आयोजित त्यांनी आपली सुरक्षितता आणि आपले उद्योग व्यवसाय तसेच भ्रष्टाचारी कारकीर्द लपवण्यासाठी पडद्यामागे राहण्यासाठी धडपड चालवली. 
भारतीय जनता पार्टीने या भ्रष्टाचारी काँग्रेस सरकारला दूर केल्यामुळे जनतेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नव्या कारकिर्दीकडे देशाचे लक्ष लागले होते याच कार्य काळामध्ये देशाने अनेक मोठे आणि ऐतिहासिक तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करून अत्यंत दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. प्रशासनामध्ये डीजीटीलायझेशन करण्यासाठी सरकारने कायम पुढाकार घेतला. पेपरलेस कारभार आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार अशा प्रकारची प्रतिमा नरेंद्र मोदी यांनी आपली निर्माण करण्यामध्ये यश मिळवले आणि पुन्हा 2019 मध्ये चांगला विजय प्राप्त केला, त्या पाठोपाठ 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना देशाने पंतप्रधान म्हणून बसवले. या काळात काँग्रेस पक्ष आणि भाजप विरोधी पक्ष यांनी भारतीय जनता पार्टीला कळवा विरोध केला नाही.
भारतीय जनता पार्टीच्या विरोधी असणारे काँग्रेस पक्ष आणि इतर सहकारी यांनी ज्यांना काँग्रेसने मोठे केले ज्यांना काँग्रेसने पाठबळ दिले त्यांना काँग्रेसच्या पाठबळावर आपले साम्राज्य उभा करण्यामध्ये आयुष्य खर्ची घालावे लागले असे सर्व सहकार सम्राट साखर सम्राट शिक्षण सम्राट आणि अब्जावधी रुपये गुत्तेदारीसाठी खर्च करणारी सर्व गुत्तेदार मंडळी अशा मस्त मंडळींनी शांत राहणे पसंत केले आणि आपल्या पुढील पिढीला काँग्रेसचे नेतृत्व देण्यासाठी हालचाली पडद्यामागे चालवल्या आपण स्वतः मागे राहिले आणि पक्ष अडचणीत असताना मात्र नव्या लोकांना पुढे करून भारतीय जनता पार्टीला विरोध करण्याचा केविलवाणा पयत्न चालवला तो प्रयत्न 2019 पासून दिसत होता परंतु 2024 मध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टी विरोधी केंद्रातील आघाडीमध्ये देखील फारशी ताकद राहिली नाही.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा झालेला पराभव हा भाजप विरोधी शक्तीला खूप मोठा सेटबॅक ठरला आहे. भारतीय जनता पार्टीचा पराभव कोणी करू शकते की नाही अशा प्रकारची परिस्थिती देशांमध्ये निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टी करीत असलेले राजकारण आणि निवडणुकीमध्ये त्यांना मिळणारी यश याच्या संदर्भात कधी निवडणूक आयोगाला दोष दिला जातो कधी निवडणूक आयोगाच्या मतदान घेणाऱ्या मशीन्स आरोपीच्या पिंजऱ्यात असतात अनेक वेळा फिक्सिंग केल्याचा देखील आरोप होतो. भारतीय जनता पार्टीचे यश आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्याचे सामर्थ्य कोणत्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये नाही. 
परिणामी भारतीय जनता पार्टीचे 11-12 वर्षाची कारकीर्द वेगवेगळ्या निर्णय आणि प्रगती करण्याच्या टप्प्यावर करण्यात आलेले खाजगीकरण या विषयाच्या अनुषंगाने अनेक वाद विवाद आणि आरोप प्रत्यारोप केले जातात. 2026 वर्ष उजाडले आणि अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टी या राजकीय प्रयत्नाच्या माध्यमातून देशामध्ये तरुणांचे आंदोलन उभे राहिले नीट पेपर फुटीचा मुद्दा कळीचा मुद्दा ठरला या महत्त्वाच्या विषयावर देशाने गांभीर्याने आंदोलनाकडे पाहिले आणि आंदोलनाला यश मिळाले. या पाठोपाठ काँग्रेस पक्षाचा देखील विरोधी पक्ष म्हणून असणारा कौल आणि वरील पक्षाचे असणारी भूमिका उठावदार दिसू लागली राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसने या मुद्द्याला चांगले पेटवून ठेवले त्यामुळे मागील दोन चर महिन्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून या विद्यार्थ्याच्या बाजूने बोलले या विषयाच्या अनुषंगाने या आंदोलनाच्या अनुषंगाने प्रत्येक राज्यामध् कोठे न कोठे विद्यार्थ्यांचे आंदोलन उभे राहत आहे. डावे आणि उजवे या वादामध्ये आंदोलन आलेले आहे. केंद्र सरकारने नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना सर्वांनी ताकद दिली परंतु ममता बॅनर्जी यांचा पराभव थांबला नाही तेथे भारतीय जनता पार्टीने खूप मोठा विजय प्राप्त केला. 2029 लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्वाच्या आहेत या निवडणुकांमध्ये राहुल गांधी आणि त्यांच्या सहकारी सोबत असणारे विरोधी पक्ष नेते किती प्रभावी ठरतात यावरच मोदी सरकारचे भवितव्य राहणार आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून उभे करण्यात आलेले तरुणांच्या आंदोलन केंद्र सरकारने नरेंद्र मोदी कल्पकतेने आगामी काळात हातरणार कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांनी आजपर्यंत सर्व पातळीवर काम केले आहे.
त्यामुळे कोणतेच आव्हान त्यांना कठीण जाणारे नाही तरी परंतु लोकशाहीमध्ये सर्वांना समान मानले पाहिजे या धोरणाने राहुल गांधी आणि विरोधी पक्ष निश्चितपणे 2029 लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत यामध्ये यश मिळेल की पुन्हा भाजप मुसंडी मारेल आज सांगता येणे नाही. विरोधी पक्षाच्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी नरेंद्र मोदी अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीकडे आगामी काळात निश्चितपणे तरुण आणि बेरोजगार युवकांना घेऊन मास्टर प्लॅन येऊ शकतो नोकऱ्यांची मोठी भरती होऊ शकते तरुणांमध्ये चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारचा वापर होऊ शकतो आणि तो केल्याशिवाय सरकारला पुढे जाता येणार नाही कारण आजची परिस्थिती तरुणांची बेरोजगारांची आणि नोकरीच्या अनुषंगाने अत्यंत संवेदनशील आहे. नोकऱ्या असताना भरती होत नाही आणि भरती झाली तरी ती योग्य प्रमाणात होत नाही कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे आणि किमान 35 हजार वेतन देणाऱ्या नोकऱ्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत दीड लाख पगारावर सर्व नोकऱ्या लॉक झाल्या पाहिजेत प्रत्येक कुटुंबामध्ये एका व्यक्तीला नोकरी दिली गेली पाहिजे म्हणजे सर्वांना नोकऱ्या मिळणे शक्य होईल. कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे आणि संगणकाचा देखील मोजका उपयोग झाला पाहिजे त्याशिवाय नोकऱ्या राहणार नाही टिकणार नाहीत आणि नव्या तरुणांना त्या मिळणार नाहीत. याच मुद्द्यावर सरकारला मोठे काम करावे लागणार आहे.
सरकारकडून काम नाही झाले तर 2029 मध्ये प्रचारात तरुणांची मोठी गर्दी सरकारला डोकेदुखी ठरू शकते.
डाव्या पक्षाच्या कम्युनिस्ट आणि पुरोगामी विचाराच्या मंडळींनी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तयारी नियोजनबद्ध करून केंद्रातील सरकारला नरेंद्र मोदी ल आणि भारतीय जनता पार्टीला घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच भवितव्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषता परीक्षा पद्धतीमध्ये असणाऱ्या त्रुटी तसेच परीक्षा पद्धतीमध्ये घुसलेली भ्रष्टाचार वृत्ती यामुळे हे सरकार देखील बदनाम झाले आहे आणि याचाच फायदा घेऊन काँग्रेस पक्षाने आणि तमाम विरोधी पक्षांनी भारतीय जनता पार्टीवर तुटून पडण्याची संधी सोडली नाही. परिणामी राहुल गांधी प्रभावी विरोधी पक्षनेते म्हणून नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे देशामध्ये विरोधी पक्षाचे स्थान वलयांकित आणि अधोरेखित झाले आहे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या अमर्याद सत्तेला खऱ्या अर्थाने दिशा देण्याच्या उद्देशाने लोकशाहीच्या अर्थाने विरोधी पक्ष सक्षम असणे विरोधी पक्ष नेता सक्षम असणे विरोधी पक्षातील खासदार आमदार सक्षम असणे अत्यावश्यक आहे लोकशाही सुदृढ राहण्यासाठी हे खूप गरजेचे आहे आगामी काळामध्ये राहुल गांधी यांच्याकडून चांगली राजकीय भूमिका विरोधी पक्ष म्हणून घेतली जावी आणि त्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळावा जनतेचे प्रश्न देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर चव्हाट्यावर मानले जावेत प्रसारमाध्यमांनी विरोधी पक्षाला देखील सत्ताधारी पक्षाप्रमाणे प्रसिद्धी दिली पाहिजे त्यांच्या प्रश्नांची आवश्यकता गरज आणि लोकांसाठी हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्याचे काम आगामी काळात माध्यमांना अधिक प्रभावीपणे करावे लागणार आहे.
आजच्या या निमित्ताने राहुल गांधी यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निर्माण झालेली प्रतिमा आगामी काळात होणाऱ्या 2029 निवडणुकीसाठी काय भूमिका बजावतात हे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2029 मध्ये सिद्ध होणार आहे. ( डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर मुंबई. )
0
0
7
0
4
4



