गुन्हेगारीब्रेकिंग
वेबसाईटची सुरक्षितता तपासूनच व्यवहार करा , सायबर सिक्युरिटीसाठी ईशा श्रोत्री यांच्या महत्वपूर्ण टिप्स
सायबर सिक्युरिटीसाठी ईशा श्रोत्री यांच्या महत्वपूर्ण टिप्स
0
0
7
0
4
7
सायबर सिक्युरिटीसाठी ईशा श्रोत्री यांच्या महत्वपूर्ण टिप्स
करम प्रतिष्ठानतर्फे विशेष मुलाखत
पुणे : सायबर धोके टाळण्यासाठी सुयोग्य पासवर्ड तयार करा, गोपनीय ठेवत तो ठराविक कालावधीनंतर बदला, त्यात वैयक्तिक माहिती देणे टाळा, महत्वाचे पासवर्ड मोबाईलवर संग्रहित करणे टाळा, ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना पिन सुरक्षित व गोपनीय ठेवा, स्क्रिन लॉकचा पॅटर्न ठराविक कालावधीनंतर बदला, वेबसाईटची सुरक्षितता तपासूनच व्यवहार करा, अशा मौलवान सूचना सायबर तज्ज्ञ ईशा श्रोत्री यांनी केल्या.
करम प्रतिष्ठानतर्फे सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ ईशा श्रोत्री यांची सायबर सिक्युरिटी या विषयावर रविवारी मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. श्रोत्री यांच्याशी वैशाली माळी आणि चिन्मयी चिटणीस यांनी संवाद साधला. करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर, संचालिका प्रज्ञा महाजन, प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले मंचावर होते. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रम झाला. सायबर सुरक्षा तज्ज्ञ संदीप गोडबोले यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.
मोबाईल, बँक ॲप, व्हॉटस्ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आदी समाजमाध्यमे हाताळताना त्यांचे पासवर्ड कसे असावेत, त्यांची गोपनीयता कशी सांभाळावी, वायफायचा पासवर्ड अनोळखी व्यक्तींना देऊ नये, आर्थिक व्यवहार ऑनलाईन करताना काय काळजी घ्यावी, अगदी गेमींग करताना देखील कुठली सुरक्षातत्त्वे सांभाळावीत या आणि अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पाडणारी माहितीपूर्ण सूत्रे ईशा श्रोत्री विशद केली.
प्रास्ताविकात प्रज्ञा महाजन म्हणाल्या, सायबर क्षेत्रातील सुरक्षितता सांभाळताना आधी काय झाले होते याचा विचार कमी करत पुढे काय घडू शकते आणि त्यासाठी काय खबरदारी घ्यायची या विषयी जनजागृती व्हावी या हेतूने सायबर सुरक्षा हा विषय करम प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून पुढे आणला आहे.
मुक्ता भुजबले यांनी सूत्रसंचालन केले तर वैजयंती आपटे यांनी परिचय करून दिले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नवीन तंत्रज्ञान या विषयावर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. भूषण कटककर यांनी सूत्रसंचालन केले.
0
0
7
0
4
7



