ई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंग
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ मध्ये मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

0
0
7
0
4
7
तुळजापूुर येथे मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न
तुळजापूर(दि.२९) प्रतिनिधी
येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे दप्तरविना शनिवार आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पर्यावरण पूरक माती पासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेमध्ये लाल माती, काळी माती, शाडू यापासून गणपती,खेळणी व बैल बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास ऋतुजा शहाजी कावरे हिने माती पासून गणेश मूर्ती, खेळणी, बैल कशी बनवायची ते प्रात्यक्षिक करून दाखवले शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी
कार्यशाळेत सहभाग नोंदवला या कार्यशाळेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन झाडपिडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका शिक्षक सोसायटीचे चेअरमन नागेश स्वामी, माजी चेअरमन सुनील सूर्यवंशी,शहाजी कावरे, मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र कावरे, बाळासाहेब जेटीथोर, महेंद्र पाटील ,सुरजमल शेटे, विद्यादेवी स्वामी, शिवा डाके उपस्थित होते. सदरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून माती पासून गणपती उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.
0
0
7
0
4
7



