ई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रावणाच्या मंगलमय वातावरणात धाराशिव येथे भव्य मंगळागौर महोत्सव , पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील व लेडीज क्लब वतीने आयोजन

५० हजार रूपये पहिले पारितोषक, भरगच्च सहभाग होणार, सोहळा गाजणार !

0 0 7 0 4 4
  • धाराशिव येथे ६  सप्टेंबर रोजी माहेर मंगळागौरी महोत्सव २०२६ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

तुळजापूर दि ३१ डॉ. सतीश महामुनी

मंगळागौरी म्हणजे केवळ खेळ नाही तर 
तो आहे सखींच्या मैत्रीचा, आनंदाचा आणि आपल्या समृद्ध मराठी संस्कृतीचा उत्सव , श्रावणाच्या मंगलमय वातावरणात पुन्हा एकदा रंगणार आहे ‘माहेर मंगळागौरी महोत्सव २०२६ लेडीज क्लब, धाराशिव यांच्या वतीने आयोजित या मंगळागौरी स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील सर्व सख्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन लेडीज क्लबच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील करण्यात आले आहे.

पुढची वर्षाप्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली लेडीज च्या वतीने भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये खूप छान मंगळागौरीची खेळ दिसणार आहेत. अत्यंत सुंदर आयोजन व नियोजन लेडीज क्लब आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या निमित्ताने पारंपरिक खेळांची, कलागुणांची आणि उत्साहाची धमाल अनुभवत आपल्या संस्कृतीचा वारसा धाराशिव जिल्हावासियना दिसणार आहे. धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील  यांच्या लेडीज क्लबच्या महिला पदाधिकारी टीमने अत्यंत देखणे नेतृत्व आयोजन नियोजन यावर्षी केल्यामुळे सहभागी होणाऱ्या संघांना अत्यंत समृद्ध अनुभव मिळणार आहे.

बाराशिव जिल्ह्यातील मंगळागौर खेळ सादर करणाऱ्या संघासाठी संयोजन समितीच्या वतीने प्रगतचे बक्षीसाची रक्कम आणि सन्मानचिन्ह मान्यवरांच्या शुभहस्ते दिले जाणार आहे. विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक – ₹५०,०००
द्वितीय पारितोषिक – ₹३५,०००
तृतीय पारितोषिक – ₹२५,०००
प्रोत्साहनपर पारितोषिके – ₹११,००० व ₹५,००१ अशी पारितोषिके देण्यात येत आहेत. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त मंगलागौर टीमने सहभागी व्हावे असे आवाहन आहे. स्पर्धा रविवार, ६ सप्टेंबर २०२६ दुपारी ३ वाजता
स्थळ : लेडीज क्लब, धाराशिव येथे होणार आहे.नोंदणीची अंतिम तारीख – ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत करावी. यानिमित्त….

चला सखी हो,
खेळूया… गाऊया… नाचूया…
परंपरेचा आनंद घेऊया आणि ‘माहेर मंगळागौरी’चा सोहळा अविस्मरणीय करूया!

आपली परंपरा, आपला उत्सव… आपल्या सखींचा जल्लोष!  साजरा करू या असे आवाहन  धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 0 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे