कृषीवार्तामहाराष्ट्र
नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते अमोल कुतवळ यांची महाविकास आघाडीच्या वतीने न्यायालय बस स्टॉपची केली मागणी
सर्वसामान्य माणसाच्या मागण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न, आगारप्रमुखांना निवेदन

0
0
7
0
4
4
नवीन न्यायालय येथे एसटीचा थांबा करण्याची तुळजापूर महाविकास आघाडीची मागणी
तुळजापूर दि १ प्रतिनिधी डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर नवीन न्यायालय सुरू झाले आहे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस साठी थांबा सुरू करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते अमोल कुतवळ यांनी महाविकास आघाडीच्या वतीने केली आहे.
शहरापासून खूप दूर अंतरावर नवीन न्यायालय सुरू झाले आहे. येथे न्यायालयीन कामासाठी जाणाऱ्या नागरिक आणि संबंधित सर्व घटकांना ऑटो रिक्षा खर्चाने जाणे परवडणारे नाही त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल अशा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून जाण्यासाठी न्यायालय बस थांबा सुरू करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे आगार प्रमुख तुळजापूर यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर महाविकास आघाडीचे नेते नगरपालिकेचे गटनेते अमोल कुतवळ, तोफिक शेख, नगरसेवक अक्षय परमेश्वर, सचिन जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तुळजापूर शहरामध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करण्याचे काम महाविकास आघाडीचे वतीने अलीकडच्या काळात होताना दिसते आहे त्याचाच भाग म्हणून नगरपालिकेतील गटनेते अमोल कुतवळ यांनी नवीन न्यायालय इमारत दूर झाल्यामुळे सर्व घटकांची होणारी अडचण लक्षात घेऊन या ठिकाणी एस टी महामंडळाचा बस थांबा करण्याची मागणी केली आहे अशा सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी अलीकडच्या काळात फारसे कोणी प्रयत्न केलेले दिसलेले नाही म्हणून महाविकास आघाडीचे आणि या निवेदनकर्त्यांचे या निमित्ताने विशेष कौतुक करावे लागणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नासाठी गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी अशा प्रकारचे प्रयत्न करण्याची राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सतत सवय ठेवली पाहिजे अशी अपेक्षा जाणकारांमधून आहे. या निमित्ताने महाविकास आघाडीने केलेल्या या मागणीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0
0
7
0
4
4



