ई-पेपरक्रिडा व मनोरंजन
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळाचा पट यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रंगणार, तुळजापुरात ११ व १२ सप्टेंबर रोजी आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन - प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे, उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले

0
0
7
0
4
5
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथे अंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा आयोजन
तुळजापूर दि ९ डॉ. सतीश महामुनी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत बुद्धिबळ स्पर्धांचे आयोज
न तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे करण्यात आले आहे जास्तीत जास्त महाविद्यालयाने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले व क्रीडा प्रमुख प्रा. अशोक कांबळे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर यांच्यावतीने आंतर विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन विद्यापीठाच्या ध्येयधोरणानुसार करण्यात आली आहे यासाठी विद्यापीठाची स्वतंत्र नियमावली या स्पर्धेसाठी उपयोगात आणली जाणार आहे. विजेच्या विद्यापीठाच्या नियोजनाप्रमाणे स्पर्धा संपल्यानंतर तातडीने एका बक्षीस वितरण समारंभामध्ये बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबर रोजी सकाळी उद्घाटन होईल आणि स्पर्धा 12 तारखेला दुपारनंतर संपणार आहे त्याचवेळी बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. यासाठी महाविद्यालयाच्या वतीने तयारी करण्यात आली असून विविध समित्यांमध्ये कामकाज पूर्वनियोजित केले आहे.
0
0
7
0
4
5



