आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्रसंपादकीय
नको ती चर्चा बंद करा… कोणकोणत्या गोष्टीवर महाराष्ट्रात राजकारण होते, पर्युषण पर्वाच्या निमित्ताने मांस विक्रीचे राजकारण पेटले…
धर्माचा वापर कुटुंबासाठी असावा, त्याचे राजकारण करणे चुकीचे, बंदीचा आदेश देखील चुकीचाच...

0
0
7
0
4
5
पर्युषण पर्व हे जैन धर्मातील आत्मशुद्धी, संयम, अहिंसा आणि प्राणीमात्रांप्रती करुणेचा संदेश देणारे महत्त्वाचे पर्व आहे. या काळात मांसाहार टाळण्याला धार्मिक आणि नैतिक महत्त्व दिले जाते. मात्र, पर्युषण काळातील मांसविक्री किंवा मांसाहारावरील बंदीचा प्रश्न हा धार्मिक भावना, वैयक्तिक आहारस्वातंत्र्य, व्यापाराचे अधिकार आणि सामाजिक सहअस्तित्व यांच्याशी जोडलेला आहे. त्यामुळे या विषयाकडे केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर सर्व बाजूंचा समतोल विचार करून पाहणे आवश्यक आहे.
राजकीय भूमिका
पर्युषण पर्वाच्या काळात मांसाहार किंवा मांसविक्रीवर निर्बंध घालण्याचा मुद्दा महाराष्ट्रात दरवर्षी धार्मिक भावना विरुद्ध वैयक्तिक स्वातंत्र्य या चर्चेला जन्म देतो.
एका बाजूला जैन समाजाच्या अहिंसा आणि धार्मिक भावनांचा आदर करण्याची भूमिका मांडली जाते. दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून घटनात्मक अधिकार, नागरिकांचे खाद्यस्वातंत्र्य आणि मांसविक्रेत्यांच्या व्यवसायाचा प्रश्न उपस्थित केला जातो.
राजकीय पक्षांसाठी हा विषय केवळ आहाराचा नसून मतदारांच्या भावना, धार्मिक ध्रुवीकरण, अल्पसंख्याकांच्या अधिकारांचा प्रश्न आणि सर्वधर्मसमभाव यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे सरकारने निर्णय घेताना धार्मिक भावनांचा आदर राखतानाच घटनात्मक मूल्ये आणि सर्व समाजघटकांच्या अधिकारांमध्ये संतुलन साधावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
वास्तवामध्ये आहार स्वातंत्र्य हे भाषा स्वातंत्र्याप्रमाणे आहे वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोक आहेत त्याप्रमाणे वेगवेगळे खाद्य संस्कृती जोपासणारी आपली परंपरा आहे यामध्ये कोणी कोणाच्या संस्कृतीमध्ये शिरकाव करावा अथवा टीकाटिप्पणी करावी हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो याला सामाजिक स्वरूप किंवा राजकीय स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आणि मूर्खपणाच आहे अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षाकडून पर्युषण पर्व मध्ये माणसावर बंदी घालण्याची नवी प्रथा परंपरा सुरू झाली आहे अशा प्रकारचा निर्णय घेणेदेखील अत्यंत चुकीचे आहे बंदी करणे हा शासनाचा भाग असू शकत नाही कारण दररोज कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यासाठी सरकारला मध्ये ओढणे हा संबंधित लोकांचा बुद्धीचा मूर्खपणा आहे आणि आपल्यासोबत प्रसारमध्यमाच्या माध्यमातून ही चर्चा घडवून आणणे हे देखील आठ दिवस दहा दिवस डोकेदुखीचा प्रकार आहे. बातम्या पाहणं ही काही शिक्षा नाही परंतु अलीकडच्या काळात किरकोळ मुद्दे राजकारणामध्ये आल्यामुळे राजकारणाचा दर्जा घसरल्यामुळे मांस बंदी हा विषय देखील समोर आलेला आहे या विषयाच्या अनुषंगाने सर्वांनी दुर्लक्ष करण्याची भूमिका घेऊन चर्चा बंद केली पाहिजे. पर्युषण पर्व ज्यांना निरंकार करायचे आहे त्यांनी करावे ज्यांना या काळात आपल्या कुटुंबामध्ये मासाआहार करायचा आहे त्यांनी करावा यासाठी जाहीरपणे भूमिका मांडण्याची कोणतीही आवश्यकता नाही. परंतु आज आपण जास्त शिकलेले झालो अधिक पुढारलेले झालो म्हणून कोणत्याही गोष्टीवर काहीही बोलायचे आणि दिवस वाया घालवायचा हाच प्रकार खूप मोठ्या संख्येने वाढला आहे याचा त्रास आजच्या तरुणाईला होतो आहे आणि महागाई सारख्या समस्येला होत आहे रोजगार आणि महागाई याने बेजार झालेल्या समाजाला या दररोजच्या कटकटीने मनस्ताप सहन करावा लागतो आहे कोणी याचा विचार करणार आहे की नाही हा अत्यंत चिंतेचा विषय आहे.
महाराष्ट्राला झाले आहे तरी काय ?
असा प्रश्न सामान्य माणसाच्या समोर आहे. कष्ट करणारे लोक कष्ट करत आहेत. आणि नको तो उपद्रप करणारी मंडळी त्यांच्या चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये गर्क आहे त्यांना समाजाला होणारा त्रास देखील माहिती होत नाही. डीजे लावून मिरवणुका काढणे आणि मांसाहारासारखा विषय समोर आणून बंदीची मागणी करणे हे दोन्हीही विषय सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला त्रास देणारे आहेत याविषयी सर्वसामान्य माणसांनी या दोन्ही गोष्टीकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या रोजगार नोकरी आणि प्रपंचाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
डॉ. सतीश महामुनी तुळजापूर.

0
0
7
0
4
5



