ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय
तुळजाभवानी देवीचे महाद्वारासमोर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आशीर्वाद का एक दिया… आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रज्वलित केली पणती..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आमदारांना जगजितसिंह पाटील यांच्याकडून तुळजापुरात जल्लोष...

0
0
7
8
5
8
पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी तुळजाभवानी मातेच्या चरणी ‘आशीर्वाद का एक दिया’
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून अनोखा उपक्रम
तुळजापूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ देशासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे, नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय ज्यामुळे भारतामध्ये सर्व स्तरात न्यायाची आणि समाधानाची लाट आहे, नरेंद्र मोदींनी सर्व काही करून दाखवले. भारताला महासत्तेच्या तोंडावर उभे केले आहे त्यांचे कार्य निश्चितच जगासाठी आणि आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे अशा शब्दांमध्ये तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 2014 नंतरच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळाची मुक्त कंठाने स्तुती केली. देशामध्ये 2014 नंतर विकासाची वारे निर्माण झाले आणि त्याचा परिणाम म्हणून देशातील सर्व तरुण वर्ग महिला वर्ग शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग यांना आपापल्या परीने न्याय मिळाला आहे. प्रशासकीय यंत्रणांचे करण्यात आलेले डीजीटीलायझशन हा देखील भारतामध्ये झालेला खूप मोठा बदल आणि प्रगती आहे. प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धत अवलंब केल्यामुळे आणि पेपरलेस कारभाराला प्रोत्साहन दिल्यामुळे गरीब माणसाला सहज न्याय मिळतो आहे. समाजातील सर्व स्तरातील सर्वांना ऑनलाईन पद्धतीमुळे एक समान न्याय मिळतो आहे कोणालाही वेगळी वागणूक दिली जात नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांची भारताला घडवण्याची जिद्द आणि चिकाटी पाहता आपण सर्वांनी त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करणे आणि घराघरापर्यंत ते निर्णय पोहोचवणे जनजागृती करणे लोकांना शिक्षित करणे आवश्यक आहे असे देखील या निमित्ताने आमदार राणा जगजीत सिंह नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणाले. तुळजाभवानी मंदिराच्या समोर नेत्र दीपक रांगोळी काढून त्यावर दीपपज्वलन करण्यात आले प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित भाविक भक्तांनी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पणती लावली आणि नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी आशीर्वाद का एक दिया तेवत ठेवून अनोख्या पद्धतीने दीपप्रज्वलन केले. मोदी यांना निरामय दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून देशसेवा अविरतपणे घडत राहावी, यासाठी त्यांनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात विविध ‘सेवा व संकल्प’ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुळजापूर येथे हा दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी आमदार पाटील यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात असून, त्यांच्या हातून राष्ट्रसेवेचे कार्य अखंडपणे सुरू राहावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
तुळजाभवानी मातेच्या पावन चरणी प्रज्वलित केलेला दीप हा श्रद्धा, सेवा आणि संकल्प यांचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्पही करण्यात आला.
0
0
7
8
5
8



