ई-पेपर
जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा फुले युवा मंच रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांचे रक्तदान
गणेशोत्सवाच्या दरम्यान तरुण युवकांचा चांगला उपक्रम

0
0
7
8
5
8
जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा फुले युवा मंच आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांचे रक्तदान
तुळजापूर – तुळजापूर खुर्द येथील जय शिवाजी तरुण मंडळ व महात्मा फुले युवा मंचच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २५ गणेश भक्तांनी रक्तदान केले. प्रारंभी बांधकाम व्यावसायिक ऍड अजिंक्य नन्नवरे व प्रशांत अपराध यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
तत्पूर्वी अजिंक्य नन्नवरे व प्रशांत अपराध यांनी गणेशाची आरती केली. या रक्तदान शिबिरात एकूण २५ गणेश भक्तानी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचा यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष- ओंकार भोजने
उपाध्यक्ष- अजय गायकवाड
सचिव – माऊली भोजने
कोषाध्यक्ष- महेश चव्हाण,सोनू खारे यांच्यासह नाना भोजने, सोमनाथ भोजने, मंगेश कुंभार, आकाश भोजने, नारायण भोजने, मनोज खारे, गणेश म्हैत्रे, अविनाश भोजने, पवन भोजने, समर्थ भोजने, समाधान डोके, प्रेम मडोळे, यांनी परिश्रम घेतले.
0
0
7
8
5
8



