ई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रामीण महाराष्ट्र सुधारण्यासाठी शासनाचा नवा मास्टर प्लॅन झाला पाहिजे – शिवसेना नेते ऋषिकेश मगर

मंगरूळ येथे गणेशोत्सवाच्या दरम्यान दुष्काळाची परिस्थिती पाहता शिवसेना नेते मगर यांनी व्यक्त केल्या भावना

0 0 7 8 5 8

गणेशोत्सव आणि शिवजयंती जंगी साजरी करा

शहरांच्या विकासाबरोबर ग्रामीण भागाच्या विकासाला केंद्रित करणे गरजेचे – शिवसेना नेते ऋषिकेश मगर

तुळजापूर दिनांक 18 प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आजही परिस्थिती पाहवत नाही, अल्पशा सुविधा आणि निसर्गाशी संघर्ष हा ग्रामीण महाराष्ट्रासाठी नवा नाही यासाठी सरकारकडून शहराच्या विकासाबरोबर ग्रामीण भागाच्या विकासासाठी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे, गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे शासनाकडे आग्रह करण्याची मानसिकता प्रसंगी संघर्षाची भूमिका देखील घेण्याला मागेपुढे पाहता कामा नये असे उद्गार धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेचे युवा नेते ऋषिकेश अशोकराव मगर यांनी व्यक्त केले.

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून आरती केल्यानंतर तरुण वर्गाशी अनौपचारिक बोलताना शिवसेनेचे नेते ऋषिकेश अशोकराव मगर यांनी आपले मन मोकळे केले. मंगरूळ हे राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जागरच गाव आहे येथे विचारांची मांडणी करणारे मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत या तालुक्यात या गावाने चांगला विचार देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे त्यामुळे मंगरूळ येथे मला आपण सर्व युवा वर्गाला बोलत असताना निश्चितपणे ग्रामीण भागाच्या प्रश्नांची मांडणी शासन दरबारी ठळकपणे होण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या लोकांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाणीव होण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती अशा सार्वजनिक उपक्रमांचा उपयोग करता आला पाहिजे त्यासाठी तरुणांनी विशेष लक्ष देऊन आपल्या परिसराच्या विकासासाठी विशेषतः स्वच्छता आणि नागरी सुविधा यासाठी सातत्याने लेखी निवेदन करून आवाज उठवता आला पाहिजे आणि या कामासाठी आपण निश्चितपणे ग्रामीण भागातील सर्व गावांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करू असेही या निमित्ताने शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी या तरुणांना बोलताना सांगितले.

खूप मोठ्या संख्येने लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये आहे तुलनेमध्ये सुविधा मात्र मिळत नाहीत या सुविधा मिळाव्यात यासाठी कोणतेही प्रयत्न नाहीत प्रशासकीय अधिकारी केवळ कागदपत्रे विकासाची नियोजन करत असतात परंतु या कागदावरच्या विकासाला आपल्या गावामध्ये उतरवण्यासाठी सुज्ञ आणि शिक्षित तरुणांनी याशिवाय समाजाची आणि प्रश्नांची जाणीव असणाऱ्या प्रत्येक तरुणाने या कामासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे याशिवाय ग्रामीण भागातील प्रश्न तालुक्याला आणि जिल्ह्याला त्याचबरोबर विधानसभेला आणि लोकसभेला जाणारच नाहीत आज जे होते आहे ते केवळ कागदोपत्री होत आहे अनेक योजना आकडेवारी पूर्ण करण्यासाठी राबविले जात आहेत शासनाचे गाव पातळीचे प्रतिनिधी जर गावात राहतच नसतील तर या गावाचे प्रश्न त्यांना समजणार नाहीत आणि कोणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ऐकण्याची मानसिकता या कर्मचाऱ्यांची आहे की नाही हे देखील महत्त्वाचे आहे.

तुळजापूर तालुक्याला गटविकास अधिकारी आहे परंतु हे अधिकारी गाव पातळीपर्यंत येतच नाहीत त्यामुळे तालुक्याचा प्रमुख म्हणून वावरणाऱ्या या अधिकाऱ्यांना गावचे प्रश्न आणि त्याची गरज आवश्यकता दाहकता आणि त्यामुळे होणारी लोकांची तारांबळ कळत नाही परिणामी केवळ कागदावर स्वाक्षरी करणे आणि आदेश देणे एवढेच काम या अधिकाऱ्यांना करावे लागते आणि हीच पद्धत प्रशासनामध्ये मोठी चालत आली आहे त्यामुळे आगामी काळात तरुणांनी विशेषता ग्रामीण भागातील युवकांनी गणेशोत्सव जयंती अशा सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या गावाचे सर्वेक्षण करणे आपल्या गावाची गरज कागदावर लिहून शासनापर्यंत पोहोचवणे आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी यांना दखील त्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे त्यासाठी निश्चितपणे शिवसेना पक्ष आणि आपण स्वतः या तरुणांना सहकार्य करू गावचे प्रश्न तालुक्याला जिल्ह्याला मांडल्याशिवाय गावाला नवीन निधी नवा विकास होणार नाही याविषयी उपस्थित तरुणांनी वेगवेगळ्या भावना बोलून दाखवल्या अनेकांनी काही उदाहरणे देऊन पूर्वी केलेल्या चुका देखील सांगितल्या. परंतु मंगरूळ या गावाने तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने पुढाकार घ्यावा असे कळकळीचे आवाहन या निमित्ताने शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी या गणपतीच्या पूजेच्या निमित्ताने मंगरूळ तालुका तुळजापूर येथे केले डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर पत्रकार.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे