
0
0
7
8
5
8
गौराई चांगला पाऊस येऊ दे… शेतकरी बळीराजा सुखी संपन्न होऊ दे…जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्याकडून महालक्ष्मीकडे साकडे
तुळजापूर दि २० डॉ .सतीश महामुनी
पारंपरिक महालक्ष्मी गौरी गणपती पूजनाच्या दरम्यान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील यांनी आलेला हा दुष्काळ दूर कर चांगला पाऊस होऊ दे व बळीराजा शेतकरी सुखी संपन्न होऊ दे अशी विनवणी घालणारे साकडे घातले . दुष्काळाने गंभीर झालेल्या परिस्थितीमुळे अशा सणवारावर देखील मोठा परिणाम होतो लोकांना सणवार करण्यासाठी चांगला पाऊस असणे गरजेचे आहे त्यामुळे महालक्ष्मीच्या या कृपा आशीर्वादाने आगामी काळात चांगला पाऊस होऊन सदैव पावसाचा सुकाळ निर्माण होऊ दे अशा भावना त्यांनी या निमित्ताने व्यक्त केले आहेत.
गौरी-गणपतीच्या मंगलमय पर्वात धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील यांनी आपल्या निवासास्थानी गौरी गणपती सणांमध्ये उत्साहात सहभाग घेतला दरम्यान आलेल्या सर्व महिला भगिनींच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
गौरी-गणपती सणानिमित्त गौरीमातेचे पूजन व आरती केली. यावेळी भेटीसाठी आलेल्या महिला भगिनींशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली, अनुभव जाणून घेतले आणि विविध विषयांवर मनापासून संवाद साधला.
हळदी-कुंकवाच्या निमित्ताने झालेल्या या जिव्हाळ्याच्या भेटीत स्नेह, आपुलकी आणि विश्वासाचे बंध अधिक घट्ट झाले. सणाच्या आनंदात सहभागी होत महिला भगिनींसोबत घालवलेले हे क्षण मनाला विशेष समाधान देणारे ठरले. उपस्थित महिलांनी परस्परांना अत्यंत आदरपूर्वक हळदी कुंकू केले.
0
0
7
8
5
8



