तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाचा धार्मिक कार्यक्रम जाहीर
११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना व २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा
तुळजापूर दि २१ डॉ. सतीश महामूनी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये यावर्षीचा नवरात्र महोत्सवाचा धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये १४ दिवसाचा धार्मिक कार्यक्रम असून ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून जाहीर करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रम पत्रिकेनुसार ६ ऑक्टोबर रोजी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची मूर्ती चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित होऊन दुपारी बारा वाजता पारंपारिक पद्धतीने घटस्थापना होईल याच दिवशी स्थानिक ब्रह्म वृंदांना वर्णी देण्याचा कार्यक्रम आहे. नवरात्राच्या १२ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दुसऱ्या माळेपासून चौथ्या माळी पर्यंत दररोज सकाळी नित्य उपचार पूजा रात्री दहा वाजता छबिना असे धार्मिक विधी आहेत. १५ ऑक्टोबर रोजी ललिता पंचमी असून या दिवशी देवीला रथालंकार महापूजा केली जाईल रात्री छबिना निघेल. १६ ऑक्टोबर रोजी नित्य उपचार पूजा व देवीला मुरली अलंकार महापूजा असेल रात्रीच्या छबिना निघेल.
१७ ऑक्टोबर रोजी सकाळी नित्य पूजा त्यानंतर शेषाही महाअलंकार पूजा होईल रात्रीच्या विना निघेल. १८ ऑक्टोबर रोजी नित्यपचार पूजा व भवानी अलंकार महापूजा देवी समोर असेल रात्री छबीला निघेल. १९ ऑक्टोबर दुर्गाष्टमी असल्याने देवीसमोर नित्य उपचार पूजा झाल्यानंतर महिषासुर मर्दिनी महाअलंकार पूजा मांडली जाईल याच दिवशी वैदिक होमाला प्रारंभ होऊन ११ वाजता पूर्णावती पार पडेल. रात्री छबिना असणार आहे.
२० ऑक्टोबर रोजी महानवमीचा दिवस असून या दिवशी होमा वरील धार्मिक विधी बारा वाजता होईल याच वेळी देवीचे घट उठवण्यात येतील. सायंकाळी शहराच्या सीमेवर शमी पूजन होईल या दिवशी भिंगार होऊन येणाऱ्या नगरच्या पलंग पालखीचे तुळजापुरात आगमन होते. याच दिवशी पहाटे २१ ऑक्टोबर रोजी नगरच्या पलंग पालखीमध्ये ऐतिहासिक तुळजाभवानी देवीचे शिलंगण संपन्न होते. देवी पुन्हा मंचकी निद्रा घेते. पुढे पाच दिवस म्हणजे २५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे.
२६ ऑक्टोबर रोजी मंदिराची पौर्णिमा आहे, देवीची मूर्ती मध्यरात्री देवीची मूर्ती मुख्य चांदीच्या सिंहासनावर प्रतिष्ठापित होते. या दिवशी सोलापूर येथील शिवलाल तेली समाजाच्या काठ्याचे आगमन तुळजापुरात होते तीन दिवस या काट्यासोबत देवीचा छबिना काढला जातो. या दिवशी देवीचे महंत जोगवा मागतात. २७ ऑक्टोबर रोजी देवीची नित्य उपचार पूजा याशिवाय अन्नदान व सोलापूरच्या काट्यासोबत छबिना असा धार्मिक कार्यक्रम आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त नगरपरिषद तुळजापूर आणि महसूल प्रशासन पोलीस प्रशासन यांच्याकडून शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.