ब्रेकिंगराजकिय

परंडा च्या भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांचा पुढाकार, किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी दहा कोटी रुपये निधी

परंडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची ऐतिहासिक किल्ल्यास भेट

0 0 7 8 5 8

परंडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांची ऐतिहासिक किल्ल्यास भेट

परंडा/ तुळजापूर : दिनांक २१ डॉ. सतीश महामुनी 

परंडा येथील भुईकोट ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनासाठी मिळालेल्या दहा कोटी रुपये निधीचा उपयोग अत्यंत चांगल्या पद्धतीने व्हावा, या दुरुस्तीनंतर अनेक वर्ष किल्ला भक्कम राहावा त्यासाठी कामाच्या गुणवत्तेमध्ये तडजोड करता कामा नये हा किल्ला संपूर्ण जिल्ह्याचा गौरवाचा विषय असल्यामुळे त्याच पद्धतीने या निधीचा विनियोग करण्यात यावा अशा महत्त्वाच्या सूचना धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पाटील यांनी केल्या.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परंडा येथील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी ऐतिहासिक परंडा किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी किल्ल्याच्या विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू, मस्जिद , महादेव मंदिर, नृसिंह मंदिर, दारुगोळा साठवणूक व्यवस्था, जुनी विहीर, भांडार तसेच किल्ल्याभोवतालचा खंदक परिसर आणि झाडी-झुडपे यांची पाहणी करण्यात आली. किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करताना त्याचे मूळ ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी आतापर्यंत शासनाकडून किती निधी प्राप्त झाला, त्यातून कोणती कामे करण्यात आली, करण्यात आलेल्या कामांचा विनियोग कशा पद्धतीने करण्यात आला, तसेच यापुढे कोणती कामे प्राधान्याने हाती घेणे आवश्यक आहे, याबाबत संबंधितांकडून अध्यक्षांनी माहिती घेतली.

किल्ल्यांच्या सर्वांगीण संवर्धनासाठी अंदाजे १० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, या निधीतून किल्ल्याच्या संरक्षण भिंती, वास्तू, परिसर स्वच्छता, खंदक तसेच अन्य ऐतिहासिक घटकांच्या संवर्धनासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपत त्याचे अधिक भक्कम व मजबूत स्वरूपात संवर्धन करण्यासाठी प्राप्त निधीचा योग्य व नियोजनबद्ध वापर करण्यात यावा, अशा सूचना अर्चनाताई पाटील यांनी दिल्या.

परंडा किल्ला हा धाराशिव जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाचा महत्त्वपूर्ण ठेवा असून, या ऐतिहासिक वास्तूचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या निधीतून किल्ल्याच्या संवर्धनाची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केल्या.

यावेळी जिल्हा परिषद धाराशिव चे कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे, सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण सभापती तथा परंडा नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. रत्नमाला राहुल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.राहुल बनसोडे,श्री. प्रवीण शिंदे, युवा नेते, किल्लेदार श्री.मयूर डाके, श्री.अभिजीत बनसोडे तसेच संबंधित अधिकारी व नागरिक उपस्थित होते. या निमित्ताने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांनी संपूर्ण किल्ला परिसरामध्ये फेरफटका मारून कोठे कोठे दुरुस्तीची आवश्यकता आहे आणि सर्व काम दर्जेदार झाले पाहिजे प्राचीन किल्ला हा संपूर्ण जिल्ह्याचा गौरवाचा विषय आहे त्यामुळे  आलेल्या निधीच्या विनीयोगामधून चांगले काम व्हावे अनेक पिढ्यांना हा किल्ला मार्गदर्शक आणि पाहण्यासाठी चांगला वाटावा अशा सूचना त्यांनी या निमित्ताने केल्या. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या किल्ल्यांची दुरुस्ती केली जाते त्यामधून या किल्ल्यामध्ये कोणत्या पद्धतीने दुरुस्ती करणे आहे याविषयी देखील जाणकारांनी विशेषता प्रशासकीय पातळीवर खात्री करून घेऊनच निर्णय घ्यावेत कोणत्याही परिस्थितीमध्ये परंडा येथील या किल्ल्याच्या कामामध्ये गुणवत्ता सांभाळली जावी गुणवत्ते सोबत तडजोड करू नये अशा महत्त्वाच्या सूचना देखील जिल्हा परिषद अध्यक्ष सौ पाटील यांनी या किल्ला भेटीमध्ये केल्या. मला या किल्ल्याला भेट देता आली किल्ला पाहता आला आणि शासनाच्या या निधीचा उपयोग करून अनेक दिवसाची परंडावासी यांची मागणी देखील पूर्ण करण्यामध्ये खारीचा वाटा उचलता आला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे असे देखील जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी बोलून दाखवले. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे