ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय

तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे शिवसेना शिंदे गटात युवक कार्यकर्त्यांचा प्रवेश, ओमराजे निंबाळकर व ऋषिकेश मगर यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी तुळजापूर तालुक्यात सकारात्मक वातावरण

0 0 7 8 5 8

शिवसेना शिंदे पक्षाला तुळजापूर तालुक्यात ऋषिकेश मगर यांच्या माध्यमातून मिळाले खंबीर नेतृत्व

तुळजापूर दि 22 डॉ .सतीश महामुनी

तुळजापूर तालुक्यातील नव्या पिढी मधील शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी शिवसेना पक्षासाठी संघटनात्मक काम करण्यासाठी मागील काही महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संपर्क अभियान सुरू केली आहे. तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये ऋषिकेश मगर यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात जनसंपर्क ठेवलेला असल्यामुळे त्यांच्या  काँग्रेस पक्षांमधील पूर्वीचा अनुभव त्यांना शिवसेनेच्या या हिंदुत्ववादी आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सोबतच्या वाटचालीमध्ये राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि तालुक्यासाठी अनुकूल दिसतो आहे . तालुक्याच्या राजकारणामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी शिवसेना पक्षाच्या वतीने ऋषिकेश अशोकराव मगर भरून काढताना दिसत आहे त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना पक्षासाठी मोठी जमिनीची बाजू ठरतो आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण होत आहे कार्यकर्त्याला काम करण्यासाठी बळ देणे त्याचबरोबर अत्यंत विश्वासाने ग्रामीण भागातील प्रश्नासाठी तालुका आणि जिल्हा पातळीवर पाठपुरावा करणे याशिवाय दिलेला शब्द पाळण्यासाठी दिवस रात्र कष्ट करून लोकांची कामे करण्यासाठी धडपडणे अशा गुणवैशिष्ट्येमुळे शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी काँग्रेस प्रमाणेच शिवसेनेमध्ये देखील आपले राजकीय वजन वाढविले आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून देखील ऋषिकेश मगर शिवसेना पक्षाकडून लढू शकतात अशा प्रकारची तयारी अप्रत्यक्षरीत्या दिसून येते आहे. शिवसेनेच्या राजकीय वर्तुळामध्ये माणसं सांभाळणारा नेता म्हणून ऋषिकेश मगर यांनी काही महिन्यांमध्ये आपले स्थान प्रस्थापित केले आहे.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत,युवा नेते ऋषिकेश भैय्या मगर यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील श्री मल्लिनाथ महाबोले,श्री सिद्धलिंग कोरे,श्री शरद बागडे,श्री सतीश देडे,श्री रजनीकांत घंटे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला अशी माहिती जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. आपल्या सोशल मीडिया हँडल वरून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे.

प्रवेश केलेला सर्व शिवसैनिक कार्यकर्त खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना नेते ऋषिकेश मगर यांनी शिवसेनेच्या विचारांवर आणि मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात सहभागी झालेल्या सर्व नवनियुक्त शिवसैनिकांचे मनःपूर्वक स्वागत व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत असल्याचे म्हटले आहे. ऋषिकेश मगर यांच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर आणि शिवसेनेचे पाठबळ निश्चितच तुळजापूर तालुक्यात वाढते आहे त्यामुळे राजकीय दृष्ट्या शिवसेना शिंदे पक्षाला या तालुक्यात चांगले वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे