
0
0
7
8
5
8
तुळजापुरात जवाहर तरुण मंडळाला मोठी परंपरा – शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर
तुळजापूर दि २३ डॉ. सतीश महामुनी
समाजकारण व राजकारणाची खूप मोठी परंपरा असणारे तुळजापुरातील जवाहर तरुण मंडळ हे खऱ्या अर्थाने माझ्या सामाजिक आणि राजकीय आयुष्याची जडणघडण करणारी चळवळ आहे तेथे श्री गणेशाची आरती करण्याचा बहुमान प्राप्त झाला याचा मनस्वी आनंद आहे अशा शब्दात शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी आपल्या भावना समाज माध्यमावर व्यक्त केले आहेत.
काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील व शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते गणपतीची आरती संपन्न झाली त्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
तुळजापूर शहरांमध्ये वैचारिक आणि राजकीय अधिष्ठान प्राप्त झालेले जवाहर तरुण मंडळ हे अत्यंत प्रतिष्ठेचे गणेश मंडळ आहे वर्षभर या संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन कार्यक्रम त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. शंभर वर्षापेक्षा जास्त या मंडळाला परंपरा असल्यामुळे जवळपास काँग्रेस विचाराचे आणि इतर देखील वैचारिक भूमिका मांडणारी युवक याच तरुण मंडळाच्या कामकाजामधून शहराला व तालुक्याला प्राप्त झाले आहेत 
जवाहर तरुण मंडळ हा कबड्डी संघ म्हणून देखील राज्यभर लौकिक पात्र होता याच कबड्डी संघाचे खेळाडू अशोकराव मगर यांनी संपूर्ण राज्यभर कबड्डी खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली याच तरुण मंडळाच्या कामगिरीवर त्यांना राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कला व क्रीडा तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये या संस्थेचे सतत वर्चस्व राहिलेले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांच्या शुभहस्ते गणपतीची आरती संपन्न झाली.
याप्रसंगी प्रतिमा देऊन या दोन मान्यवरांचा जवाहर तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. या निमित्ताने अनौपचारिक रित्या वार्तालाप करण्यात आला व या दोघांनी जवाहर तरुण मंडळाच्या कामगिरीचा या निमित्ताने गौरव केला.
0
0
7
8
5
8



