ई-पेपरकृषीवार्तानोकरी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अत्यंत महत्त्वाचा, अशा महत्त्वाच्या प्रसंगी नोटंकी करणे अशोभनीय – आमदार राणा जगजितसिंह पाटील गरजले

मुख्यमंत्री महोदयाचा दौरा धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत समाधानकारक सरकार निश्चित मदत करणार

0 0 7 8 5 8

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर- धाराशिव-सोलापूर सह राज्यभरातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला – आमदार राणा जगजीत सिंह पाटील

तुळजापूर/ धाराशिव दि २५ डॉ. सतिश महामुनी

दुष्काळाने होरफडलेल्या शेतकऱ्याला धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यामुळे खूप मोठा आधार मिळालेला आहे, हे सरकार निश्चितपणे शेतकऱ्याला भरीव मदत देणार आहे, मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्याला दिलेला शब्द ते निश्चित पाळतील त्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांना या दुष्काळाच्या संकटाच्या काळात या सरकारने खूप मोठे मदत करण्याचा निर्धार केलेला आहे लवकरच ही मदत सर्व शेतकऱ्यांना प्राप्त होईल अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्या दरम्यान सर्व लोकप्रतिनिधींनी अत्यंत संवेदनशीलतेने महत्त्वाच्या दुष्काळाच्या आणि शेतकऱ्याला न्याय देण्याच्या प्रसंगी गांभीर्याने संबोधन करणे अपेक्षित असताना काही विरोधी आमदारांनी केलेली नोटांकी निश्चितच निषेधार्य आहे यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे अशा प्रश्नांमध्ये राजकारण करणे गैर आहे आपण कायम जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने विचार करतो अशा गैर विषयासाठी आपल्याजवळ वेळ नाही. जबाबदारीने राजकारण करणे जबाबदारीने शेतकऱ्याच्या प्रश्नाला झोकन देणे त्याचबरोबर दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्यात आल्यानंतर आपण ज्या गांभीर्याने हा विषय त्यांच्यासमोर मांडला पाहिजे याचा विसर देखील या लोकांना पडला असेही या सर्व परिस्थितीवरून दिसून येईल आलेले आहे.

मुख्यमंत्री महोदय यांचा झालेला दौरा हा सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत समाधानाचा विषय आहे ज्या विरोधी लोकप्रतिनिधींनी नौटंकी करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना या जिल्ह्यातील जनता निश्चित धडा शिकवीन असा सणसणीत इशारा देखील आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी या निमित्ताने दिला.

आमदार जगजीत सिंह पाटील यांनी समाज माध्यमावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव आणि लातूर सोलापूर दौऱ्यादरम्यान ते धाराशिव जिल्ह्यात करजखेडा येथे पाहणी करत असताना ज्या विरोधी आमदारांनी मुख्यमंत्री महोदयांना दुष्काळाच्या दाहक परिस्थितीशी जाणीव करून देणे ऐवजी नौटंकी करून विरोध करण्याचा प्रयत्न चालवला हा प्रयत्न निश्चितपणे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे. या काळात सर्व पत्रकार आणि सर्व दुष्काळग्रस्त शेतकरी बंधू भगिनी हे देखील या सर्व घटनांचे साक्षीदार आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये या जिल्ह्यातील जनता या विरोधी लोकप्रतिनिधी यांना निश्चितपणे धडा शिकवेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.

ही वेळ निश्चित शेतकरी बांधवांना मदत करण्याचे आहे मागच्या अनेक दिवसांपासून आपण सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बांधावर जाऊन परिस्थिती अवलोकन करतो आहोत आणि त्याचे अहवाल प्रशासनाच्या मार्फत तसेच मंत्रालयापर्यंत पोहोचवल आहेत. या अति गंभीर परिस्थितीची जाणीव प्रशासनाला करून देण्यासाठी आपण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे या दौऱ्या दरम्यान देखील मुख्यमंत्री महोदयांना शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती करून देण्यासाठी अनेक पातळीवर आपण काम केले आणि मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व बाबींची नोंद घेतली आहे. शेतकऱ्यांशी बोलत असताना मुख्यमंत्री देखील संवेदनशीलतेने गहिवरून आल्याप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधत होते, शेतकरी बांधवांनी आपल्या अडचणी मांडत असताना तसेच शेती प्रश्नाच्या अनुषंगाने विविध प्रश्न विचारले तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी ज्या आत्मविश्वासाने त्यांना शब्द दिला आहे हे सरकार निश्चितपणे शेतकऱ्याला दिलेला शब्द पाळतील आणि धाराशिव लातूर तसेच सोलापूर सह उर्वरित सर्व महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला या सरकारकडून निश्चितपणे भरीव मदत होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे कोण्या एका दुसऱ्या विरोधी विचाराच्या व्यक्तीने लोकप्रतिनिधी देणे याविषयी विडंबन करण्याचा प्रयत्न केला तर तो त्यांची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आणि पातळी दाखवून देतो.

पिण्याच्या पाण्यावर संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी चिंता व्यक्त केली विहिरी असल्यामुळे आणि तलाव कोरडे पडल्यामुळे उजनी धरणातून एक टीएमसी पाणी केवळ पिण्याच्या वापरासाठी राखीव करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत आगामी काळामध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला आणि दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी न्याय देण्याच्या अनुषंगाने या सरकारने विविध योजना आखलेले आहेत अनेक योजना अंतिम टप्प्यात आलेले आहेत कृष्णा मराठवाडा सिंचन योजना त्यातलीच एक योजना आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातले असून लवकरच उजनीचे पाणी देखील आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे आपले प्रयत्न सुरुवातीपासून सुरू आहेत सातत्याने प्रशासनाबरोबर पाठपुरावा करण्याचे काम आपण केलेले आहे आपण केलेल्या कामाची नोंद जिल्ह्यातील जनतेने घेतलेली आहे घेते आहे त्यामुळे अशा दौऱ्यामध्ये नौटंकी करणे माझ्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही त्यामुळे त्याला जास्त महत्व न देता केंद्र सरकारने राज्य सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या शासकीय आदेशाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे त्याचा उपयोग सामान्य माणसाला शेतकऱ्याला महिला भगिनी तसेच युवक वर्गाला झाला पाहिजे असा माझा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आपण सातत्याने काम करतो प्रयत्न करतो अशा वेगळ्या गोष्टीकडे पाहण्यासाठी आपल्याला वेळ नाही चांगले काम करून जिल्ह्यातील जनतेची सेवा करणे हेच आपले राजकारणातील उद्दिष्ट आहे असेही या निमित्ताने आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना बोलून दाखवले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे