ब्रेकिंगसंपादकीय

दुष्काळाची दाहकता समजून घेतल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सततचा पाठपुरावा

धाराशिव लातूर सोलापूर आणि वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचे मुख्यमंत्र्याकडून सूक्ष्म पाहणी

0 0 7 8 5 8

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आत्मविश्वास लाख मोलाचा, दुष्काळग्रस्त भागाचा केलेला दौरा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक

तुळजापूर /धाराशिव दि २५ डॉ .सतीश महामुनी 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला दिलासा आणि केलेला दौरा यामुळे दुष्काळाच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहणार नाही याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. करसखेडा आणि जाऊ येथे शेतकऱ्यांशी वार्तालाप केल्यानंतर आणि परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती आणि पाण्याची परिस्थिती याचे अवलोकन करून सरसकट मदत देण्याच्या अनुषंगाने केलेले विधान शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे आहे. धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती आमदार राणा जगजितसिंह पाटील पालकमंत्री प्रताप सरनाईक व लातूर जिल्ह्यातील परिस्थिती  आमदार संभाजी पाटील निलंगेकर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयासमोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ग्राउंड रिपोर्ट लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलेला हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंगा तालुक्यातील जाऊ येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला प्रत्यक्ष शेताला भेट दिली त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा या गावाला भेट दिली तेथे एका लघुसचन प्रकल्पाला भेट दिल्यानंतर कोरडा पडलेला तलाव पाहिला, आमदारांना जगजितसिंह पाटील यांनी जवळच असलेला दुष्काळामुळे वाढत चाललेला ऊस मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला तेव्हा सदर उसाच्या पिकाची देखील मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली. कळम तालुक्यातील मलकापूर येथे देखील त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. वाशिम जिल्ह्यामध्ये मसला गव्हाण मोहन आणि जवळका या गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याची मुख्यमंत्री महोदयांनी भेट घेतली तेथील दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यात कारंजा येथे देखील मुख्यमंत्री महोदयांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचे अवलोकन केले. यादरम्यान संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले प्रताप सरनाईक व जयकुमार गोरे हे उपस्थित होते याशिवाय आमदार राणा जगजीत सिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बसवराज पाटील, आमदार विजय देशमुख आमदार सुभाष देशमुख, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कुलकर्णी, भाजपचे नेते नितीन काळे यांच्यासह इतर महायुती मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने या दौऱ्यामध्ये सर्वत्र सहभागी झालेले दिसून आले.

दुष्काळाचे प्रचंड दाहकता लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी केवळ दहा ते बारा टक्के धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस झाल्याचे मान्य केले. सरासरी पावसापेक्षा 80% पाऊस कमी झाला तर दुष्काळ मान्य केला जातो त्यापेक्षा देखील अत्यंत कमी पाऊस या भागात पडल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या आणि हातामधून वाया गेलेले वाळून गेलेले सोयाबीन सारखे पीक यामुळे हा अत्यंत गंभीर दुष्काळ आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यासमोरच शेतात उभे राहून मान्य केलेले आहे. अशा प्रकारची पाहणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी करणे खरोखरच धाराशिव लातूर आणि सोलापूर या परिसरातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. कितीही मागण्या करून किंवा वस्तुस्थिती प्रसारमाध्यमांमधून मांडण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी या सर्व परिस्थितीचे अवलोकन केले पाहणी केली त्यामुळे ही मदत मिळण्याच्या अनुषंगाने खूप मोठा अडथळा दूर झाला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची संवाद साधला शेतकऱ्याचे अश्रू देखील घुसण्याचे काम त्यांनी केले अनेक महिला शेतकरी भगिनींनी आपले दुःख मुख्यमंत्र्यांसमोर मांडत असताना तुम्हीच आमचे भाऊ आहात अशा प्रकारची संवेदनशील हाक देखील घातली तेव्हा निश्चितपणे मदत केली जाईल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच शिवारामध्ये उभा राहून दिलेला आहे.

विहिरीची पातळी शून्य झाल्याचे देखील त्यांनी मान्य केले त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आगामी काळात सोडवावा लागेल चाऱ्याचा प्रश्न देखील सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या रब्बी पिकाच्या हंगामासाठी देखील शेतकऱ्याला मदत करण्याची तयारी राज्य सरकार करते आहे या अडचणीच्या काळात अन्नधान्य पुरवठा देखील करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहणार नाही . शेतकऱ्याचे लाईट बिल यापूर्वीच माफ केले आहे ते वीज माफीचे धोरण पुढे चालू राहील त्याचबरोबर कर्जमाफी केलेली आहे त्यामुळे कोणत्याही बँकेला वसुली या काळात करता येणार नाही जर कोणी करत असेल तर त्यांना योग्य ते निर्देश दिले जातील असे एका पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र तामलवाडी शाखेमधून शेतकऱ्याला त्रास दिला जातो असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी कोणत्याही बँकांनी वसुली करू नये अशा प्रकारचा सुचवाच आणि आदेश यावेळी दिलेला आहे. 

आमदाराना जगजीत सिंह पाटील यांचा विश्वास

या दौऱ्याच्या निमित्ताने आमदारांना जगजित पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करण्याची भूमिका यापूर्वीच घेतलेली आहे त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी दुष्काळग्रस्त भागाचा केलेला दौरा महत्त्वाचा आहे मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय आणि सरकार या सर्व शेतकऱ्यांना चांगली मदत करेल. पिक विमा देखील शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना या अत्यंत अडचणीच्या काळात राज्य सरकार चांगली मदत करण्याच्या मानसिकतेत आहे लवकरच ती मदत शेतकऱ्यांना थेट खात्यावर मिळणार आहे. अशा अडचणीच्या काळात सर्व राजकीय हेवेदावे दूर करून आपण शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि त्या भूमिकेसाठी आपण मागच्या महिनाभरापासून संपूर्ण जिल्ह्यात दौरे करून प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्याला मदत करण्यासाठी धावपळ केलेले आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे ही सर्व धावफळ निश्चितपणे शेतकऱ्याच्या पदरी पडणार आहे याचा मला विश्वास आहे. 

,.  

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे