ई-पेपर

ही वेळ शेतकऱ्याला सावरण्याची, खचलेला शेतकरी आणि महिला भगिनी यांच्या गळाभेटीने मुख्यमंत्री गहिवरले…मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या अनुषंगाने ओमराजे निंबाळकर खरे बोलले…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्याच्या अनेक विषयांना तोंड फुटले...

0 0 7 8 5 8

दुष्काळाने खचून गेलेल्या शेतकऱ्याला सावरण्याची ही वेळ आहे, राजकारण चुलीत घालून जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचे आवश्यकता

तुळजापूर धाराशिव दि २६ डॉ. सतिश महामुनी

चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शेत शिवारामध्ये भेट देऊन खचलेल्या शेतकऱ्याला आणि कुटुंबातील माता-भगिनींना भेटले, त्यांच्या दुःख वेदना आणि दुष्काळाची दाहकता अनुभवल्यानंतर मुख्यमंत्र्याच्या प्रोटोकॉलला देखील बाजूला व्हावे लागले, अनेक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याची गळाभेट घेऊन आपले दुःख आणि आपले अश्रू प्रस्तुत केले. हे दुःख पाहून मुख्यमंत्र्यांनी सर्वच शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा घेतलेला पवित्रा खऱ्या अर्थाने खचलेल्या शेतकऱ्याला मोठा आधार ठरणार आहे.

दरम्यान जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसह पाटील या दोघांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन्ही बाजूला उभे राहून लोकप्रतिनिधी म्हणून आणि या गंभीर परिस्थितीची जाणीव मुख्यमंत्री महोदयांना विशेषता मंत्रालयातील अधिकाऱ्यांना होण्याच्या अनुषंगाने दोघांनीही चांगली भूमिका बजावली. खासदार आणि आमदार यांच्यामध्ये राजकीय वैर आहे यांच्यामध्ये पवन राजे हत्याकांडाची झालर आहे. परंतु दोघेही जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. इतर प्रसंगांमध्ये एकमेकांवर टीका करणे किंवा आरोप प्रत्यारोप करणे हा त्या दोघांच्या राजकारणामधील प्रमुख अध्याय आहे. ओम राजे निंबाळकर आक्रमकपणे राणा दादा यांच्यावर टीका करतात परंतु राणा दादा मात्र आक्रमकपणे ठिकाण न करता आपल्या शैलीमध्ये ओमराजे यांना उत्तर देत असतात. अनेक वर्षापासून चाललेला या दोघांमधील आणि दोन पक्षांमधील राजकीय संघर्ष आहे परंतु या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणीत मदत करण्याच्या प्रसंगांमध्ये आपल्यामधील लोकप्रतिनिधित्व विशेषता जबाबदारीचे राजकारण दाखवले.

परंतु माध्यमातून अनेक प्रतिनिधी ओमराजे यांना राणा दादा यांच्यासोबत गाडीमध्ये बसणे किंवा  या दौऱ्यामध्ये दोघांच्या राजकीय वर्तनावरून विचारणा करण्यात आली आणि त्याला ओमराजे निंबाळकर यांनी जे उत्तर दिले ते अत्यंत समर्पक आणि प्रसंगानुरूप ठरले आहे. आपल्या वडिलांच्या हत्याकांडाशी निगडित विषय असल्यामुळे ते सहन करू शकले नाहीत, त्यांनी सरळ पत्रकारालाच प्रश्न विचारून िचारणार्‍या पत्रकाराला निरुत्तरित केलेले आहे. वास्तविक पाहता प्रसारमाध्यमातील पत्रकार आणि प्रतिनिधी यांनी अशा विषयाला अशा दौऱ्यामध्ये आणि दौऱ्यानंतर देखील जोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत बाजूला ठेवले पाहिजे. राजकारण बारा महिने चालत आली आहे परंतु शेतकऱ्यावर आलेली ही वेळ अत्यंत आपत्ती जनक आहे गंभीर आहे आणि या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी त्याला आज शासनाच्या मदतीची गरज आहे त्यामुळे सर्वच माध्यम प्रतिनिधी यांनी शेतकऱ्याला मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त चांगले वार्तांकन करण्याची आवश्यकता आज धाराशिव जिल्ह्यामध्ये गरजेची आहे.

विनाकारण राणा दादा आणि ओमराजे यांच्या राजकीय वैराला फुंकर घालण्याचा प्रयत्न करणे शेतकऱ्याच्या गंभीर परिस्थितीला शोभणारे नाही. आजच्या घडीला केवळ आणि केवळ शेतकरी आणि त्याला मिळणारी शासनाची मदत याच्या भवतीच काम करण्याची मोठी आवश्यकता आहे गरज आहे. राणा जगजीत सिंह पाटील आमदार असले तरी ते जिल्ह्याचे नेते असल्यामुळे सदैव त्यांच्याकडून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने वेगवेगळे प्रस्ताव आणि त्या अनुषंगाने शासन दरबारी केलेले प्रयत्न प्रसारमाध्यमांमध्ये मांडले जातात त्याला देखील अनेक जण टीकात्मक पद्धतीने घेतात हे देखील टाळले पाहिजे कारण एखादा नेता एखाद्या योजनेसाठी किंवा प्रशासकीय मंजुरीसाठी प्रयत्नशील असेल तर त्याला सतत हिणवणे आणि अनौपचारिक रित्या टीका करणे कितपत योग्य आहे कारण या जिल्ह्यांमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी अनेक वर्ष राजकारण केल्यानंतर त्यांची जागा आमदार राणा जगजितसह पाटील यांनीच घेतलेली आहे राज्यपातळीवर देखील राहणार दादांच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला मान्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणा जगजितसिह पाटील यांचे निकटचे संबंध सर्वश्रुत आहेत. तीन पक्षाचे सरकार आणि आघाडीचे राजकारण यामुळे राणा दादा यांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आहे म्हणून त्यांचे महत्त्व कमी होत नाही हे देखील सर्वांनी ओळखले पाहिजे विशेषतः जे लोक त्यांच्यावर टीका करतात त्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे. राजकारणामध्ये धोरणात्मक विरोध करणे ठीक आहे परंतु व्यक्तिगत टीका टिपणी करणे टाळले पाहिजे ज्याच्यामुळे राजकारणाचा स्तर घसरतो आणि जिल्ह्याचा राजकीय लौकिक कमी होतो अशा गोष्टी टाळ्या पाहिजेत आपल्याला काही सूचना असतील तर आपण प्रत्यक्ष भेटून देखील त्यांच्याशी चर्चा करू शकता कारण आपण पत्रकार म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आमदार असो वा खासदार कोणाशीही मित्रत्वाने आणि अनौपचारिकपणे बोलत असतो मग चांगल्या सूचना करण्यासाठी आपल्याला कोण अडवले आहे मित्रत्वाच्या नात्याने किंवा आपला हक्क म्हणून देखील आपण या नेत्यांना आपली भूमिका पटवून देऊ शकतो यादेखील बाबीचा विचार शेतकऱ्यांच्या या आपत्तीच्या काळात सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. आपला जिल्हा तसा कायमच अडचणीचा राहिलेला आहे त्यामुळे आपल्या मागचा दुष्काळ आणि अडचणी कधीच संपणार नाहीत त्यामुळे गांभीर्याने पत्रकारिता आणि गांभीर्याने विकासाचे विषय हाताळण्याची मोठी नेतांत गरज आहे त्याच्यावर जिल्ह्याच्या विकासाची प्रगती अवलंबून आहे. विडंबन व टीका केवळ म्हणून असू शकते परंतु त्याच्यामधून विकासाची गती वाढत नाही हे देखील सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे डॉक्टर सतीश महामुनी तुळजापूर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

मराठी समाचार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 7 8 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे